कोल्हापूर : कन्नड भाषिक तरीही कोल्हापूरच्या मातीशी एकरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापूर : कन्नड भाषिक तरीही कोल्हापूरच्या मातीशी एकरूप

कोल्हापूर: विठ्ठल सुतार वाणिज्य शाखेचा पदवीधर. तो आता कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उतरला आहे. त्याचा भाऊ मोनेश सुतार हा सुतार कामात हात आजमावत आहे. त्यांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील चंदरगी. सुतार कुटुंब कन्नड भाषिक असले तरी ४० वर्षांच्या वास्तव्यात ते कोल्हापूरच्या मातीशी एकरूप झाले आहे.

शंकर सुतार गाव सोडून व्यवसायानिमित्त कोल्हापुरात आले. भाड्याच्या खोलीत त्यांनी संसार थाटला. कळंबा, पोवार कॉलनीनंतर रामानंदनगर येथे भाड्याच्या खोलीत ते राहिले. सुतार कामातील आर्थिक कमाईतून त्यांनी रामानंदनगर येथे जागा खरेदी केली. तेथे कौलारू घर बांधले. घरात कन्नड भाषा बोलली जात असली तरी त्यांनी मुलांना मराठी शिकविण्यासाठी पुढाकार घेतला. गावी असलेल्या आई-वडिलांकडे त्यांनी मुलांना शिक्षणासाठी पाठवले नाही. कोल्हापुरातील मराठी शाळेत त्यांची मुले शिकली. विठ्ठलने वाणिज्य शाखेचा पदवीधर होऊन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामात लक्ष घातले आहे.

विशेष म्हणजे त्याने मर्दानी खेळाचे प्रशिक्षणही घेतले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्याचे सादरीकरण केले आहे. १५ वर्षांपूर्वी शंकर सुतार यांनी फर्निचर व्यवसायाचा श्री गणेशा केला असून, मातीच्या कौलारू घराचे रूपांतर सिमेंटच्या इमारतीत केले आहे. वारकरी असल्याने आळंदी ते पंढरपूर दिंडीत त्यांचा सहभाग असतो.

सुतार यांची चंदरगीला शेती आहे. तेथे मूग, मका, भुईमूगाचे पिक घेतले जाते. वर्षांतून काही महिने ते गावी जातात. कोरोना काळात दोन वर्षे ते एकटे गावीच राहिले. कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांनी व्यवसायात पुन्हा जोमाने लक्ष घातले.

Web Title: Kolhapur Kannada Speaking Yet United Soi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top