कोल्हापूर : मराठा तरुणांना ‘सारथी’ची साथ

लोकसेवा परीक्षेत २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
Sarathi Institute
Sarathi Institutesakal

कोल्हापूर : मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) २२ विद्यार्थांची यूपीएसी-२०२० च्या अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यात ६ ‘आयएएस’ (भारतीय प्रशासकीय सेवा), ८ ‘आएपीएस’ (भारतीय पोलिस सेवा), ३ ‘आयआरएस’ (प्राप्तिकर अधिकारी) व ५ इतर केंद्रीय सेवा यादीत नियुक्त झाले आहेत.सारथी कार्यालयाकडून १८ ते ४५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांना याचा लाभ दिला जात आहे.

कोल्हापूर येथे २६ जून २०२१ ला सारथीचे उपक्रेंद्र सुरू केले आहे. राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेतून दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना महिन्याला ८०० रुपये, तर वर्षाला ९६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. सध्या राज्यातील १०२५६ विद्यार्थ्यांना ९ कोटी ३८ लाख रुपये दिले जातात. ‘एमपीएससी’ २०२० च्या परीक्षेत १९८ विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीत आले. यात ७० जणांची विविध पदांवर नियुक्तीही झाली. इंडो जमिनटूल या संस्थेकडून कौशल्य विकासाचे २० कोर्सेस राबवणाऱ्यांत कोल्हापूर केंद्राचा समावेश आहे.

‘एमकेसीएल’ संस्थेमार्फत संगणक व व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी १० हजार विद्यार्थ्यांसाठी २७ कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. सारथी संस्थेसाठी पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, खारघर (मुंबई), या ठिकाणी शासनामार्फत कार्यालय व वसतिगृहासाठी जागा दिली आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप

एमफील व पीएचडी करणाऱ्या १२५४ विद्यार्थ्यांना महिन्याला १२४५ विद्यार्थ्यांना ३५ हजार ते ४० हजारांपर्यंत फेलोशिप दिली जाते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (एमएसएसडीएस) मार्फत कौशल्य वृद्धीचे २००० पेक्षा जास्त अभ्यासक्रम महाराष्ट्रात सुरू आहेत. यासाठी ३६ कोटींहून अधिक खर्च केले जात आहेत.

‘सारथी’कडून आणखी काही योजना राबविता येतील का? याबाबत तज्ज्ञ किंवा इतरांनी सूचना कराव्यात. ज्या योजनांमुळे मराठा समाज, कुणबी समाजासाठी याचा फायदा होईल. त्यांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करता येईल, या दृष्टीने सर्वांनी सूचना सारथीकडे पाठवाव्यात.

- अशोक पाटील, निबंधक, सारथी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com