Kolhapur : बाजार समितीसाठी आज मतदान; निवडणूक प्राधिकरणाकडून मतदार यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur market committee election voting today voter list announced politics

Kolhapur : बाजार समितीसाठी आज मतदान; निवडणूक प्राधिकरणाकडून मतदार यादी जाहीर

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीचे उद्या शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ७० मतदान केंद्रावर आज दुपारी मतदानाचे साहित्य पोहचले असून, एकूण ४८० कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर आज रवाना झाले. या निवडणुकीत एकूण १८ जागांसाठी एकूण ५१ उमेदवार रिंगणात आहेत, तर २१ हजार ६०० मतदार मतदान करणार आहेत.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र सहा तालुक्यात आहे. यात करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील हे मतदान होईल. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात होणार आहे. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते, माथाडी अशा गटामधील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सेवासंस्था, व्यापारी अडते, माथाडी सदस्य मतदान करणार आहेत. मतदारांची यादी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे. त्यांना ओळखपत्रही दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

तो’ मतदार एकदाच मतदान करेल

कोल्हापूर - शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकच व्यक्ती एकच मतदानाचा नुकताच दिलेले आदेश आज जिल्हा सहकार उपनिबंधकांनी आज अंशतः मागे घेत सुधारीत आदेश लागू केला. त्यानुसार एकाच मतदार संघात एकापेक्षा जास्त वेळा मतदारांचे नाव असेल तर तो मतदार एकाच वेळेला मतदान करेल.

वेगवेगळ्या मतदार संघात एखाद्या मतदाराचे नाव असल्यास तर तो ज्या मतदार संघात त्यांचे नाव असेल तेथे प्रत्येक ठिकाणी तो मतदान करण्यास पात्र असेल. उदाहरणात एकच मतदार ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सेवा संस्थेत संचालक असेल तर तो दोन्ही ठिकाणी मतदान करेल. मात्र, विकास सेवा संस्था संचालक दोन किंवा दोन पेक्षा जास्त संस्थेत संचालक असेल तर तो मतदान एकदाच करेल, अशा सूचना निवडणूक केंद्राध्यक्षानी मतदान प्रक्रियेवेळी पाळाव्यात, असेही या आदेशाचे म्हटले आहे.

‘त्या’ आदेशांवर हरकत

एकच व्यक्ती एकच मतदानाचा आदेश सहकार निबंधकांनी बुधवारी काढला होता. या आदेशाचा फटका व्यापारी उमेदवारांना बसणार होता. उमदेवार कुमार आहूजा व वैभव सावर्डेकर यांनी आज जिल्हा सहकार उपनिबंधकांची भेट घेतली. यावेळी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आदेश काढला.

तो आदेश योग्य व कायदेशीर मानावा कसा असे लेखी पत्र दिले. तसेच वरील आदेशामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या आदेशाचा फेरविचारकरून मतदारांना पूर्वीप्रमाणेच मतदान करण्यास मान्यता द्यावी, असेही यापत्रात म्हटले होते. यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधकांनी दुपारीच पहिला आदेश अंशतः मागे घेऊन सुधारीत आदेश काढला. तोही सायंकाळी बदलून आणखी नवा आदेश काढला.

‘त्या’ गटाकरिता एकदाच मतदान

वरील सुधारीत आदेशानुसार एखाद्या मतदाराचे नाव एक मतदार यादीत किंवा संघात कितीही वेळा असले तरी त्या मतदारास त्या गटाकरीता एकदाच मतदान करता येईल. अशा सूचना निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक केंद्राध्यक्षानाही दिल्या आहेत.

ग्रामपंचायत गट

गट - जागा - उमेदवार

 • सर्वसाधारण - २ - ५

 • अनु.जाती जमाती - १ - ३

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल - १ - २

 • अडते व्यापारी - २ - ८

 • माथाडी मापाडी - १ - ७

गटनिहाय मतदान असे

गट - जागा - उमेदवार

सर्वसाधारण -७ - १६

महिला प्रतिनिधी - २ - ४

इतर मागासवर्गीय - १ - ३

विमुक्तजाती

भटक्या जमाती - १ - २

तालुकानिहाय मतदान केंद्र

 • करवीर - ७

 • कागल - ४

 • भुदरगड - ४

 • राधानगरी - ६

 • पन्हाळा - ६

 • शाहूवाडी - ३