esakal | Rain Update - कोल्हापुरात पावसाची पुन्हा रिपरिप सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात पावसाची पुन्हा रिपरिप सुरु

दरम्यान गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्राला झोडपुन काढले आहे.

कोल्हापुरात पावसाची पुन्हा रिपरिप सुरु

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर - गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा हाहाकार सुरु आहे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होत. अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. यातील बऱ्याच ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता.

हेही वाचा: यंदाची 'स्वाभिमानी' ची ऊस परिषद 19 ऑक्‍टोबरला ; राजू शेट्टी

कोल्हापुरातही आज सकाळपासून पाऊसाची रिपरि सुरु आहे. शहरांसह जिल्ह्यातील काही भागांत पाऊसाची संततधार चालु आहे. शहर भागांत अधून मधून एखादी मोठी सर सुरु आहे. यामुळे काही प्रमाणात बाजारपेठ थंड आहे. पाऊसाच्या जोरदार सरींनी शहरात पाणीच पाणी केले. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहराच्या गर्दीवर काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. जोरदार सरीमुळे दुचाकीस्वारांनी मिळेल तेथे आसरा घेवून पुन्हा पुढील प्रवासासाठी जाणे सुरूच ठेवल्यामुळे शहरात गर्दी होती. घाटमाथ्यांसह दरडी कोसळण्याच्या ठिकाणी दक्षता घेतली जात आहे. हा पाऊस नेहमीच्या तुलनेत नगण्य असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण

दरम्यान गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्राला झोडपुन काढले आहे. या परिसरात मध्यरात्रीपासून आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस पडत असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल ५२.२ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असल्याने औरंगाबाद शहरात हाहाकार उडाला आहे.

loading image
go to top