कोल्हापूर : मल्टिट्रेड कंपनी अधिकाऱ्यांकडून २१८ कोटींचा गंडा ?

जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
Kolhapur Jilha Parishad News
Kolhapur Jilha Parishad Newssakal

कोल्हापूर : एका मल्टिट्रेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गेले २२ महिने पैसे जमा केले होते. यातून त्यांनी तब्बल २१८ कोटी रुपयांना चुना लावल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याचे कुटुंबीय सध्या गायब झाले आहे. त्यांनीच ही फसवणूक केल्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.

फसवणुकीत एका महसूलच्या गावपातळीवरील अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. फसवणुकीबाबत सोशल मीडियावर संबंधितांच्या नावासह एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केल्यास वस्तूस्थिती स्पष्ट होणार आहे; मात्र पोलिस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा नोंद झाल्याचे रात्री उशिरापर्यंत दिसून आलेले नाही.

फसवणुकीत कोल्हापुरातील उपनगरातील आणि ग्रामीण भागातील कुटुंबच आहे. सध्या ते पसार झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी ही फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये मल्टिट्रेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकसुद्धा त्याच कुटुंबातील असल्याची माहिती सोशल मीडियावरील त्या मेसेजमध्ये आहे. कंपनीत पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना गेले चार महिने पैसे मिळालेले नाहीत. त्यांनी याबाबतची तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना न्याय मिळाला नसल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. कारवाई होईल, या भीतीने संबंधित कुटुंब बेपत्ता झाल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com