गोकुळनंतर आता लक्ष्य महापालिका; महाविकास आघाडी सज्ज

महाविकास आघाडी मजबूत होणार; शिवसेना स्वतंत्रपणे लढणार
गोकुळनंतर आता लक्ष्य महापालिका; महाविकास आघाडी सज्ज

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीला (kolhapur municiple corporation)अद्याप अवधी असला तरी 'गोकुळ'च्या निकालामुळे महाविकास आघाडी अधिक भक्कमपणे सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या सुमारास महापालिकेची निवडणूक होईल, असे सध्याचे चित्र आहे. पालकमंत्री सतेज पाटील, (satej patil) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, (hasan mushrif) खासदार प्रा. संजय मंडलिक (sanjay mandalik) यांची मोट कायम राहणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी (congress, NCP) तसेच शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाईल.

15 नोव्हेंबरला संपलेल्या सभागृहात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कायम होता. 'गोकुळ'मधील (gokul Election) यशामुळे नेत्यांचा आत्मविश्‍वास अधिक दुणावणार आहे. 81 जागांवर आघाडीचे उमेदवार उभे राहतील. काही प्रभागात त्यांचे अंडरस्टॅंडिंग असेल. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर( rajesj kshirsagar)ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) किती जागा निवडून आणायच्या, हे दोन्ही कॉंग्रेस पूर्वी ठरवत होते. येत्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसवरच शिवसेनेची मदार असणार आहे.

गोकुळनंतर आता लक्ष्य महापालिका; महाविकास आघाडी सज्ज
रोज भाजी बनवून कंटाळला असाल तर या टिप्स झटपट करून देतील तुमचं काम

सतेज पाटील यांनी प्रारंभी विधान परिषद निवडणूक जिंकली. नंतर 'आमचं ठरलंय'चा नारा देत लोकसभा निवडणुकीत त्यांनी ताकद दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj patil) यांच्या विजयात मोठा वाटा राहिला. 'गोकुळ' हे त्यांचे अंतिम लक्ष्य होते. ते साध्य झाल्याने महापालिका निवडणुकीच्या जोडण्या लावण्यास ते रिकामे झाले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- ताराराणी आघाडी अधिक मजबूत होते. त्या वेळी सतेज पाटील हे एकाकी होते. तरीही कॉंग्रेसच्या चिन्हावर 27 जागा निवडून आल्या. अडचणीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने साथ दिली. शिवसेनेचे चारही नगरसेवक आघाडीबरोबर राहिले.

ताराराणी आघाडीचे नेतृत्व पूर्वीपासून माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrav mahadik) यांनी केले. माजी खासदार धनंजय महाडिक (dhanajy mahadik) गेल्या निवडणुकीत ताकदीने उतरले. भाजप-ताराराणी आघाडीच्या 33 जागा येऊनही ते सत्तेपासून दूर राहिले. महापालिकेची निवडणूक कोरोनामुळे पुढे गेली आहे. सर्व 81 प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाले. पावसाळा संपल्यावर महापालिकेच्या घडामोडींना वेग येईल. कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे.

गोकुळनंतर आता लक्ष्य महापालिका; महाविकास आघाडी सज्ज
आजींची इच्छाशक्ती जिंकली! 98 व्या वर्षी कोरोनावर केली मात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com