जादा खरेदी दराचा परिणाम! गोकुळ दूध संकलनात ४० हजार लिटरची वाढ

Gokul Milk
Gokul Milk

कोल्हापूर : इतर संघांच्या तुलनेत गोकुळकडून गायीच्या दूधाला जादा दर मिळत आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे गायीच्या दूधाचे संकलन ५० ते ५० हजार लिटरने वाढले आहे.

Gokul Milk
शेतातून यायला उशीर झाल्याने शोधाशोध केली, पण...; पोहताना दम लागल्याने एकाचा मृत्यू

शिरोळ तालुका, मिरजसह कर्नाटक विभागातून ही दूध संकलन वाढ दिसून येत आहे. गोकुळकडे दररोज ६ लाख ८८ हजार ५५९ लिटर दूध संकलन होत आहे. यामध्ये गेल्यावर्षी ६ लाख २७ हजार ८९५ लिटर दूध संकलन झाले होते. आज याच दुधात तब्बल ६० हजार ६६४ लिटरची तर सरासरी ४० ते ५० हजार लिटर दूध संकलनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटकमधील काही दूध संघांनी गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर ५० पैसे ते १ रूपये ५० पैशांपर्यंत कपात केली आहे. याउलट गोकुळ गाय दूध उत्पादकांना चार पैसे जास्त मिळावेत यासाठी दरामध्ये कोणतीही कपात केली नाही. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.

Gokul Milk
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गायीला 70 तर म्हशीला 80 हजार; शासनाने वाढविली निर्धारित किंमत

त्यामुळे गोकुळकडे दूध विक्री करण्याचा कल वाढला आहे. गाय दूध दरात सरासरी दररोज चाळीस हजार ते पन्नास हजार लिटर दूधाची वाढ झाली आहे. शिरोळ तालुक्यातून अनेक गावातील दूध जे गोकुळकडे येत नव्हते ते पुन्हा गोकुळला दिले जात आहे.

मिरज, कर्नाटक सिमा भागातील शेतकरीही गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. यामुळे संकलनाचा आकडा वाढत आहे. दरम्यान, म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी गोकुळला आणखी प्रयत्न वाढवावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com