हद्दपार केलेल्या नेमिष्टे गँगच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांंचा दणका | Kolhapur crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

हद्दपार केलेल्या नेमिष्टे गँगच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांंचा दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : तीन महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या नेमिष्टे गँगच्या म्होरक्याला (Nemishte Gang leader) शहरात फिरताना पोलिसांनी पकडले. अक्षय नेमिष्टे (Akshay Nemishte) असे त्याचे नाव असून त्याला उत्तम प्रकाश चित्र मंदिर परिसरातून पोलीस उपाधीक्षक पथकाने (police team) ताब्यात घेतले आहे. गावभाग परिसरात दहशत असणाऱ्या या टोळीला दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील नेमिष्टे हा शहरात फिरताना आढळून आला आहे. त्यामुळे आता हद्दपार केलेल्यांवर करडी नजर पोलिसांना ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा: काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत पसरविणार्‍या सराईत 'नेमिष्टे गॅंगला'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. या पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार टोळीप्रमुख अक्षय राजेंद्र नेमिष्टे, सदस्य गणेश बजरंग नेमिष्टे, राजेंद्र गजानन आरगे, शुभम राजेंद्र नेमिष्टे,सुंदर रमेश नेमिष्टे (सर्व रा.शेळके गल्ली) यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले. मात्र हद्दपारीचा कालावधीत संपायच्या आतच शहरात फिरताना आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक पथकाने त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली.

loading image
go to top