Kolhapur News : आई-नाना, त्याला माफ करु नका; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या | Kolhapur news young girl suicide after harrasement of a boy in kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagar crime
Kolhapur News : आई-नाना, त्याला माफ करु नका; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Kolhapur News : आई-नाना, त्याला माफ करु नका; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा एक छक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहिली आहे. यामध्ये या तरुणाला फाशीची शिक्षा दया, अशी मागणीही या तरुणीने केली आहे.

कोल्हापूर शहरातल्या बोंद्रेनगर परिसरात नकुशा साऊ बोडेकर या तरुणीने आपल्या नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केली आहे. नकुशाने आपल्या सुसाईड नोटमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्पष्टपणे लिहिलं आहे. त्यामुळे आता त्या तरुणाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नकुशाच्या घरच्यांनी मांडली आहे.

दहावी झाल्यानंतर नकुशा घरकाम करुन कुटुंबाला हातभार लावत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या नातेवाईकांकडे बोंद्रेनगरला आली होती. १५ मार्च रोजी ती घरात एकटी होती. तेव्हा तिने छताला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी कडी तोडून दरवाजा उघडल्यावर हा प्रकार लक्षात आला.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

"मी एका मुलामुळे जीव देत आहे. बोंद्रेनगरमध्ये राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारेन अशी धमकी मला त्याने दिली आहे. तो मला सुखाने जगू देणार नाही. म्हणूनच मी जीव देत आहे. आई-नाना सॉरी. त्याला माफ करु नका. (त्रास देणाऱ्याचे नाव) त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या, तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल."

टॅग्स :crimeattempt to suicide