Kolhapur By Election : मतांचा टक्का वाढला; धक्का कुणाला..?

केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतांचा टक्का वाढला आहे.
Election voting
Election votingsakal media
Summary

केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतांचा टक्का वाढला आहे.

कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच (Paschim Maharashtra) नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Byelection) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतांचा (Voting) टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार, याविषयी उत्सुकता आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदानाची नोंद २०१९ मध्ये जिल्ह्यात झाली त्याच वेळी सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघात उत्तरचा समावेश होता. यावेळी ही आकडेवारी वाढली आहे. या मतदारसंघात सुशिक्षित, उच्चभ्रू मतदारांची संख्या मोठी असून अपेक्षित मतदान होत नसल्याचा दावा यंत्रणेचा आहे.

काँग्रेस आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यातून मतांचा टक्का वाढला आहे. २०१९ मध्ये सर्वसाधारण निवडणुकीत या मतदार संघात ५९ टक्के मतदान झाले होते. यावेळी हे मतदान ६१ टक्क्यांच्या आसपास होईल. २०१४ मध्ये मात्र ६१.५२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये सेना, भाजपसह दोन्हीही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्याचा परिणाम मतांची टक्केवारी वाढला. २०१९ मध्ये भाजप-सेना युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होती, त्यामुळे मतांच्या टक्केवारीत घट झाल्याचे सांगितले जाते. त्यातही गेल्या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे यापेक्षा पाडायचे कोणाला यासाठीच मतदान झाल्याने ही टक्केवारी घटल्याची शक्यता आहे.

या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेससह भाजपही ताकदीने रिंगणात उतरला होता. भाजपने पूर्ण निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर नेऊन ठेवली, त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर पंचाईत होती. त्यामुळे शिवसेनेकडूनच भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर दिले गेले. या ‘हिंदुत्व’च्या कार्डबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरूणांत असलेले आकर्षण, दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी मतांचा टक्का वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.

कार्यकर्त्यांचा ठोकताळा सुरू

सायंकाळी सहाला मतदान संपल्यानंतर भागनिहाय मतांची आकडेवारी एकत्रित करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून मतांचा लेखाजोखा मांडण्याचे काम सुरू झाले आहे. बावडा, शिवाजी पेठ या चुरस असलेल्या भागात कोणाला किती मते पडणार, सुशिक्षित मतदार, झोपडपट्टी, मुस्लिम बहुल मतदारसंघात किती मतदान झाले, त्यात आपल्याला किती पडेल आणि शेवटच्या टप्प्यात राबवलेल्या ‘यंत्रणा’ कितपत यशस्वी होणार याचा अंदाज बांधत आकडेमोड सुरू झाली आहे. शनिवारी (ता. १६) मतमोजणीदिवशी कोणाचा अंदाज खरा ठरला हे स्पष्ट होईल.

दृष्टिक्षेपात तीन निवडणुकीतील मतदान

२०१४ ६१.५२

२०१९ ५९.००

२०२२ सुमारे ६१ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com