esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : दुसऱ्या दिवशी जोतीबाची तीन पाकळी सोहन पुष्पातील महापूजा

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता.पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी सकाळी तीन पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली .जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास मोठे पारंपरिक महत्त्व असून याठिकाणी नवरात्र उत्सव दिमाखात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवरही हा सण साजरा केला जातोय.आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थिती मध्ये धूपारतीचा सोहळा ढोल,पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.

यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते . सकाळी दहा वाजता हा सोहळा ज्योतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. व या सोहळ्याची सांगता झाली. यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर व परिसरात आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पाहताना मन प्रसन्न होत आहे.

loading image
go to top