कोल्हापूर : राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला प्रा. एन. आय. खोत,माणिक पाटील, भाऊसाहेब झिणगे पाठींबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टी

कोल्हापूर : राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला प्रा. एन. आय. खोत,माणिक पाटील, भाऊसाहेब झिणगे पाठींबा

निपाणी: निपाणी तालुक्यातील वीजप्रश्नात लक्ष घालण्यासह सीमाभागातील साखर कारखान्यांकडे एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याची मागणी करा, त्यासाठी निवेदन देण्याची सूचना माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील कार्यकर्त्यांना केली. कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी गेल्यावर निपाणी भागातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांशी माजी खासदार शेट्टी यांनी संवाद साधून निपाणी भागातील माहिती घेतली.

हेही वाचा: Kolhapur : नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

यावेळी निपाणी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार शेट्टी यांच्या आंदोलानाला पाठींबा दिला. शिवाय निपाणी तालुका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन. आय. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भाग स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी राजू शेट्टी य़ांनी शेतकरी आणि शेतीशी संबंधित वेगवेगळ्या मुद्यावर कार्यककर्त्यांनी लढा देण्यास सज्ज राहण्यास सांगितले.

यावेळी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या शकुंतला तेली व मलगोंडा तावदारे यांनी धरणे आंदोलनासाठी आर्थिक सहकार्य केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंधर पाटील, राजेंद्र गड्यानावर, सौरभ शेट्टी, माणिक पाटील, सुकुमार कून्नुरे, तात्यासो पाटील, भाग्येश कुलकर्णी, भाऊसाहेब झिणगे, महेश पाटील, अशोक पाटील, विपुल पाटील यांच्यासह निपाणी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kolhapur Prof Raju Shetty Agitation N Income Khot Manik Patil Zinge Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurRaju ShettiSakal
go to top