Kolhapur : रेशनवर तेल, डाळ, साखर द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : रेशनवर तेल, डाळ, साखर द्या

कोल्हापूर : रेशनवर तेल, डाळ, साखर द्या, यासह अन्य मागण्यांसाठी आज लाल बावटा बांधकाम करवीर संघटनेतर्फे करवीर तहसील कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन देऊन तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यात परिपत्रकांची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते सकाळी अकरापासून दसरा चौकात जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा करवीर तहसील कार्यालयावर निघाला. मोर्चात महिलांची ही संख्या मोठी होती. ‘रेशन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,’

‘रेशनवरील उत्पन्न मर्यादा दोन लाख करा,’ ‘हम सब एक है,’ अशा घोषणा देत मोर्चा दसरा चौक सीपीआर मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चा तहसील कार्यालयासमोर थांबल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका रेशन बचाव समितीचे प्रवक्ते जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी घेतली. संघटनेचे करवीर तालुकाध्यक्ष भरमा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

मागण्यांची पंधरा दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे यांनी दिला. मोर्चासमोर येऊन नायब तहसीलदार विजय जाधव यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या विनंतीनुसार तहसीलदार मुळे-भामरे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. मोर्चात सहसचिव शिवाजी मगदूम, करवीर तालुका सचिव आर. के. पेंटर, संतोष राठोड, हिंदुराव सुतार, रमेश कांबळे, साताप्पा जाधव, रुपाली रानगे, कल्पना मगदूम, स्वाती कोराणे, जयश्री रानगे आदींचा समावेश होता.

मागण्या अशा...

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा

योजनेचे फॉर्म भरणे बंद करा, सर्वांना रेशनचा अधिकार द्या

रेशनवर जीवनोपयोगी वस्तू उपलब्ध करा

रेशनवरील उत्पन्न मर्यादा दोन लाख करा

बांधकाम कामगार, तोडणी कामगार, भूमिहीन शेतमजूर, घर कामगार अशांना लाभार्थी घोषित करा

वेळेवर धान्य न देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करा

Web Title: Kolhapur Ration Oil Dal Sugar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..