कोल्हापूर : पाणी येणाऱ्या रस्त्यांवर पहारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

कोल्हापूर : पाणी येणाऱ्या रस्त्यांवर पहारा

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पुराची पातळी कमी होत आहे. रात्री दहापर्यंत कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पातळी ३२.११ फूट होती. दरम्यान, पुरामुळे जे रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतात, अशा ३४ गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील व कोतवाल यांना तीन टप्प्यांत जागता पहारा द्यावा लागणार आहे. राधानगरी धरण ४.३० टीएमसी म्हणजे ५२ टक्के भरले. धरणातून १३५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, ४२ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कासारी, भोगावती व तुळशी नदीच्या पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जातात. या रस्त्यावरून जनावरे, वाहने किंवा माणसांची वर्दळ बंद व्हावी. तसेच, धोकादायक वाहतूक होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील व कोतवाल यांचा तीन टप्प्यांत जागता पहारा द्यावा, असे नियोजन केले आहे. पुरामुळे जनावरे, वाहने वाहून जाऊ नये यासाठी हे नियोजन केले आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाने उघडीप देऊन दिलासा दिला आहे.

येथे पथक तैनात राहणार :

पूर येणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, शिंगणापूर व रजपूतवाडी, केर्ली, बीड, बालिंगा, साबळेवाडी, दोनवडे,याशिवाय, भोगावती, कासारी व तुळशी नदीमुळे पूर येणाऱ्या राधानगरी, महे आरळे, वरणगे, कोगे, बहिरेश्‍वर, भामटे, पाडळी खुर्द, शिंदेवाडी, वडणगे, कोपार्डे येथे हे पथक तैनात केले जाणार आहे.

* ४१ बंधारे पाण्याखाली :

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, वालोली, यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सवते-सावर्डे, शिरगाव, सरूड-पाटणे, कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, कानर्डे, सावर्डे, पिळणी, बिजूर भोगोली, चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, दत्तवाड, सुळकूड, शेणवडे, कळे व बीड.

* गगनबावडा १०२.८ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक १०२.८ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्‍यात झाला आहे. तर, शिरोळ ८.५, शाहूवाडी ८१, राधानगरी ५४.५, करवीर ३४.९, कागल २५.७, गडहिंग्लज १९.१, भुदरगड ४०.४, आजरा ४०.५ व चंदगड ८०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Kolhapur Roads Water Coming Rsn

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top