esakal | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांचा मार्च   
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur shivsena protest in mangutti

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्वरित प्रतिष्ठापना करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांचा मार्च   

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मणगुत्ती  (बेळगाव) -  मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उतरविण्यात आला आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे दांडी मार्च काढण्याचा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला होता. त्यानुसार कवळीकट्टीहून शेकडो शिवसैनिक निघाले असता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर रोखण्यात आले. तेथे तहसीलदार अशोक गुराणी यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मणगुत्तीसह कवळीकट्टी भागात मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

मणगुत्ती येथे ५ आॅगस्ट रोजी प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ७ आॅगस्ट रोजी उतरविण्यात आला आहे. शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी शिवप्रेमी मणगुत्ती येथे एकवटले होते. त्यावेळी शिवपुतळा प्रतिष्ठापना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मणगुत्ती, बेनकनहळ्ळी आणि बोळशनट्टी येथील नागरिकांनी संयुक्तरित्या छत्रपती शिवाजी महाराजांसह पाच महान पुरूषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेऊन भूमिपूजन केले होते. 
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना न झाल्याने शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी कवळीकट्टी ते मणगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांच्यासह शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, मनजित माने, दिलीप माने, राजेंद्र पाटील, दत्ता टिपुकडे, संदीप पाटील, सागर कुराडे, सागर पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक दांडी मार्चने निघाले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर येताच पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. 

हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी, मंडल पोलिस निरीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी, यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेट घेऊन चर्चा केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्वरित प्रतिष्ठापना करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार गुराणी यांना त्या बाबतचे निवेदनही देण्यात आले. या प्रश्नी कर्नाटक, महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी, सीमा समन्वय मंत्री, अधिकारी व मान्यवरांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार गुराणी यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
 

हे पण वाचा - खासदार संजय मंडलिक यांच्यासह पत्नी, मुलगा कोरोना बाधित 

मणगुत्तीत सकाळपासून रस्ते रोखले

शिवसेनेने दांडी मार्चचा इशारा दिल्याने कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच मणगुत्ती येथे बंदोबस्त ठेवला होता. गावात येणारे सर्व रस्ते रोखून धरले होते. प्रत्येक वाहनासह नागरिकांची चौकशी करण्यात येत होती. तसेच गावात व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

हे पण वाचा नदीकाठच्या गावांना दिलासा ; पुराचे पाणी पात्राकडे  


संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top