कोल्हापूर : सर्वसमावेशक नेतृत्वावर समाजाची प्रगती अवलंबून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित कुलकर्णी

कोल्हापूर : सर्वसमावेशक नेतृत्वावर समाजाची प्रगती अवलंबून

कोल्हापूर : सर्वसमावेशक नेतृत्वावर समाजाची प्रगती अवलंबून असते. या दृष्टिकोनातून सरकारने विद्यार्थी निवडणुका निर्भय व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी एक कायदा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांमधून सक्षम नेतृत्व पुढे येईल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केला. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास कक्ष, नेतृत्व विकास केंद्र व बहाई ॲकॅडमीतर्फे पाचगणी येथे आयोजित तीन दिवसीय नेतृत्व विकास शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कुलकर्णी म्हणाले, ‘तत्कालीन राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या निवडणुकीसंदर्भात केलेला कायदा खूप महत्त्वाचा आहे. कायद्यातून पक्षविरहित निवडणुका होण्यास मदत होईल. निवडणुकांतील गैरप्रकार रोखणे यामुळे शक्य होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरोखरच नेतृत्व गुण आहेत, अशा विद्यार्थ्यांना निवडणुकीत चांगली संधी असेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमकेपणाने मांडणे यामुळे शक्य होईल.’ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव म्हणाले, ‘विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवतो. या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.’ बहाई ॲकॅडमीचे संचालक लेसन आझादी यांनी मनोगत व्यक्त केले.

सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभय कुमार बन्सल, नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, नवनाथ बोंबले, डॉ. संजय ठिगळे, प्रा. कबीर खराडे, प्रशांत साठे, डॉ. ए. पी. कुलकर्णी, रुसाचे वरिष्ठ सल्लागार प्रमोद पाबरेकर, शहाजी लॉ कॉलेजचे डॉ. प्रवीण पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाली, डॉ. जी. एस. राशीनकर, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक नीलेश सावे यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. पी. जी. कुंभार यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. बहाई ॲकॅडमीचे पराग तांदळे यांनी स्वागत केले.

Web Title: Kolhapur Society Depends Inclusive Leadership

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top