कोल्हापूर : साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

आंबोली ते आजरा मार्गावरील कारवाई ; संशयिताला अटक
kolhapur
kolhapuresakal

कोल्हापूर: आंबोली ते आजरा मार्गावरून बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त केला. डॅनीश कामिल फर्नाडीस (वय २६, रा. इन्सुली पागावाडी, सावंतवाडी) असे त्या संशयिताचे नाव असल्याची माहिती विभागाने दिली.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती, कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने आज आंबोली ते आजरा या मार्गावर सापळा रचून एक मोटार पकडली. त्यामध्ये ४३ मद्याचे बॉक्स मिळून आले. त्याची किमंत ३ लाख ५८ हजार ३२० रूपये इतकी असून मोटारीसह पोलिसांनी ८ लाख ७८ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित फर्नाडीसला अटक केली. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, जे. एस. पवार, कर्मचारी सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक येवलुजे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com