कृष्णेच्या पातळीत चार फुटांनी वाढ

सर्व नद्या दुथडी; चार बंधारे पाण्याखाली; सतर्कतेचा इशारा
कृष्णेच्या पातळीत चार फुटांनी वाढ

चिक्कोडी : कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगेच्या महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे यंदा चिक्कोडी तालुक्यातील बंधारे पाचव्यांदा पाण्याखाली गेले आहेत. सर्व नद्या दुथडी भरून वहात आहेत. कृष्णेच्या पातळीत बुधवारी (ता. १५) चार फुटांनी वाढ झाली आहे.

सध्या कृष्णा, दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. येडूर, एकसंबा, मलिकवाड, जुना सदलगा बंधारा पाण्याखाली आहे. नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरत असल्याने पुन्हा नागरिकांतून भीती निर्माण होत आहे. कोयनेसह पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस खात्याकडून नदीकाठावर बॅरिकेड्‌स लावून रस्ता बंद केला आहे. दिवसभरात नद्यांच्या पाणी पातळीत तीन-चार फुटांनी वाढ होत आहे.

त्यामुळे सतत पाऊस पडत राहिल्यास परत नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. महाराष्ट्र हद्दीत असलेले गवत आणण्याच्या कामात वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांना अडथळे येत आहेत. परिणामी जनावरांना चारा आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बुधवारी (ता. १५) नदीचे पाणी वाढल्याने पूर्णपणे हिरवेगार कापणीस आलेले गवत बुडून गेले आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाण्याला ओढ असल्याने भाविकांनी कसरत करत बाप्पांचे विसर्जन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com