...पाठिंबा द्या, अन्यथा घरात घुसून जाब विचारू!

छत्रपती शिवाजी चौकातून नेत्यांचा इशारा -शिवसेनेचे पदयात्रेने शक्ती प्रदर्शन
maharashtra politics Support to Shiv Sena chief Uddhav Thackeray Leaders warning from Chhatrapati Shivaji Chowk kolhapur
maharashtra politics Support to Shiv Sena chief Uddhav Thackeray Leaders warning from Chhatrapati Shivaji Chowk kolhapur esakal

कोल्हापूर - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आज पदयात्रेद्वारे शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले. गेलेल्यांनी ताताडीने परत येवून उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा अन्यथा घरात घुसून जाब विचारू, असाही इशारा पदयात्रेच्या सांगतेवेळी छत्रपती शिवाजी चौकातून देण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरासागर, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या.

दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून पदयात्रेला सुरवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांची छायाचित्रे असलेले फलक अनेक कार्यकर्त्यांच्या हातात होते. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. त्यावर एका बाजूला आम्ही हिंदू आहोत. दुसऱ्या बाजूला शिवसेना असे लिहिले होते. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पदयात्रा दसरा चौक- बिंदू चौकाद्वारे छत्रपती शिवाजी चौकात आली. नेत्यांची भाषणे झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या सर्वांनीत परत येवुन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.

माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. सर्वजण त्यांना सोडून गेले, मी एकटा राहिलो तरीही मी पक्ष सोडणार नाही हे माझे वचन असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी आमदार उल्हास पाटील यांनी आम्ही माजी आमदार गोव्यात पूर्वनियोनानुसार जमलो होतो. दुर्दवाने त्याच दिवशी घडामोडी घडल्या. आम्ही उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार आजपर्यंत काम केले आहे, यापूढे ही त्यांच्या आदेशानुसारच काम करू असे सांगितले. माजी आमदार मिणचेकर यांनी राजेश क्षीरसागर का गेले हे माहिती नाही, गोव्यातील आमच्या सहलीत सुद्धा ते काहीच बोलले नव्हते. आता आम्ही चौघे उद्धव ठाकरे यांच्‍या सोबत असू असे जाहीर केले. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी चौकात काही महिलांनी, कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणा दिल्या. यामध्ये राजेश क्षीरासागर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावरील राग व्यक्त केला.

खासदार संजय मंडलीक - काही आमदारांना गोडबोलून नेले. काही आमदारांना अमिषे दाखवून नेले तर काही आमदारांना धाक दाखवून नेले. कोणी नजरचुकीने गेला असाल तर तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यावे, असे आवाहन मी सर्व जनतेच्यावतीने करतो. शिवसैनिक आता रस्त्यावर उतरला आहे. याच्या पुढचे चित्र त्यांना पहायला लागू नये म्हणूनच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करा.

अरुण दुधवडकर - संपर्क नेते - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलून जाणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून पाठिंबा दिला हे. त्याबद्दल मी खासदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. अशी वादळे किती आले किती गेले. त्याचा फरक पडत नाही. आता एकोबा गेला आहे. त्यालाही त्याची जागा दाखवायची वेळ येणार आहे. काही आमदार गेले आहेत, त्यांना निवडणूक कोण आणले हे विसरले आहेत.

संजय पवार -जिल्हा प्रमुख - माजी आमदार दिलीप देसाई यांनी १९९१ला उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांच्या घरावर काय घडले याची पुनरावृत्ती कोल्हापुरात होऊ शकते.त्यामुळे घरात येवून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही

मुरलीधर जाधव - जिल्हा प्रमुख - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली तो आदेश आणि द्याल तो आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांसाठी मान्य असेल, जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत कोल्हापुरातील शिवसैनिक ठामपणे आपल्या पाठिशी राहणार आहे. ५६ गेले तरीही चालतील, हे शिवसैनिक पुन्हा १५६ निवडून आणतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com