रस्त्यावरून फिराल तर पीपीई किट घालून आलेले घेऊन जातात

रस्त्यावरून फिराल तर पीपीई किट घालून आलेले  घेऊन जातात

कोल्हापूर: कोल्हापुरात कडक लॉकडाऊन (Kolhapur Lockdown)मध्ये रस्त्यावरून फिराल तर पीपीई किट घालून आलेले रुग्णवाहिकेतून घेऊन जातात. पोलिसांकडून अशी कारवाई सुरू झाली असल्याचा व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पोलिसांची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे.

Malkar Tikati Post viral kolhapur lockdown video truth news

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीशेजारी माळकर तिकटी (चौक) आहे. शहरातील हा एक मुख्य चौक आहे. तेथे रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून करावाई सुरू आहे. अचानकच पोलिसांसमोर रुग्णवाहिका येते. पीपीई किट घातलेले तिघे उतरतात आणि पोलिसांसमोर रस्त्यावर फिरणाऱ्या दोघांना उचलून रुग्णवाहिकेतून घेऊन जातात.

रस्त्यावरून फिरणाऱ्यांची एकच धांदल उडते. हा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माळकर तिकटी असे पोस्ट करून हा व्हिडिओ वेगाने फॉरवर्ड होत आहे. प्रत्यक्षात ही कारवाई कोल्हापूर पोलिसांनी केलेली नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून याला नकार देण्यात आला.

याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे अधिक माहिती घेतली असता ही कारवाई झाल्याचे दाखविणारी डॉक्युमेंट्री एका हॉस्पिटलकडून तयार केली जात आहे. त्याचे हे चित्रीकरण असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी ‘सकाऴ’शी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात अशी कारवाई केली जात नसल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com