
जारकीहोळी बंधू यांचं बेळगावच्या राजकारणात मोठं प्राबल्य आहे.
Belgaum : मंत्री जारकीहोळींना मोठा धक्का; गोकाकमध्ये मोठ्या बहिणीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
बेळगाव : जारकीहोळी बंधूंची मोठी बहीण लगमाव्वा निंगाप्पा सूलधाळ (वय 67) यांचं गोकाक नगर येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गोकाक नगरपरिषदेचे माजी सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. गोकाक शहरातील कुंभार गल्ली येथील रुद्रभूमी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या बहिणीच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
साधेपणा आणि सौजन्याची आवड असलेल्या या बहिणीनं लहानपणापासूनच प्रोत्साहन आणि नेतृत्व दिलं. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे शोक व्यक्त केला आहे की, 'त्यांची बहीण गमावल्याने मला खूप धक्का बसला आहे.' जारकीहोळी बंधू यांचं बेळगावच्या राजकारणात मोठं प्राबल्य आहे.