प्रवाशांसाठी खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती.
Indian Railway
Indian Railwayesakal

मिरज : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मिरज (Miraj-Kolhapur) पॅसेंजर रेल्वे (Railway) सेवा उद्यापासून (ता.१५) पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवासांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही सुविधा सुरु केली आहे.

Indian Railway
नवाब मलिकांच्यावर ईडी कारवाई होताच मुनगंटीवार,भातखळकर म्हणाले...

मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरही पॅसेजर सुरु करवी अशी प्रवाशांची मागणी केली आहे. कोल्हापूर-मिरज पॅसेंजर ही सुरुवातीला दोन वेळेत सुटणार आहे. मिरजेतून ही गाडी दुपारी २.१४ वाजता सुटणार असून ३.३० पर्यंत कोल्हापूर स्टेशनला पोहोचेल. तसेच सकाळी १०.३० वाजता कोल्हाराहून ही गाडी सुटून ११.४५ पर्यंत मिरज स्थानकात पोहोचणार आहे.

Indian Railway
मनसे-भाजप युती होणार? गिरीश महाजन म्हणाले,वरिष्ठांचा निर्णय...

पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. मिरजेतून नियमित नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी आग्रही धरली होती. दरम्यान या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com