मुख्यमंत्री किसान योजने’चा तीन लाखांवर शेतकऱ्यांना फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm kisan yojna news

Kolhapur : मुख्यमंत्री किसान योजने’चा तीन लाखांवर शेतकऱ्यांना फायदा

कोल्हापूर : शिंदे-फडणवीस सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री किसान योजने’चा जिल्ह्यातील सुमारे ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ‘मुख्यमंत्री’ आणि ‘पीएम’ किसान योजनेचे वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ‘पीएम किसान’अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षाला मिळणाऱ्या सुमारे ३३० कोटींत मुख्यमंत्री किसान योजनेच्या सुमारे १९५ कोटींची भर पडून एकूण ५२५ कोटी रुपयांपर्यंत रक्कम वाढणार आहे.

जिल्ह्यातील ५ लाख ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ‘केवायसी’ पूर्ण केलेली आहे. दरम्यान, यात अल्पभूधारकांसह पाच एकरहून अधिक शेती असणाऱ्या खातेदारांनाही याचा लाभ मिळतो. याच योजनेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारनेही ‘मुख्यमंत्री किसान’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये सन्मान निधी देण्याची घोषणा केली आहे. सध्या तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सरकारी नियमानुसार ज्यांच्याकडे पाच एकरहून, म्हणजेच २ हेक्‍टरहून कमी जमीन आहे, अशा अल्पभूधारकांना मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या २ लाख ९० हजार खातेदार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’चा लाभ मिळतो, तर अल्पभूधारक अशी अट लावली तर सुमारे २ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री किसान योजने’चा लाभ मिळू शकतो.

- डॉ. ए. बी. माने, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅंक

Web Title: Mukhyamantri Kisan Yojana 3 Lakh Benefit To Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..