काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार
Summary

राज्य मंत्रिमंडळाने नगरपालिकांत पूर्वीचीच दोन सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना होणार हे निश्‍चित झाल्याने सत्ता मिळवण्यासाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार आहे. सद्यःस्थितीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजपला रोखण्यासाठी स्वबळाचा नारा कायम राहणार की महाविकास आघाडीचा प्रयोग होणार याविषयी उत्सुकता आहे.

राज्य मंत्रिमंडळाने नगरपालिकांत पूर्वीचीच दोन सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मुंबई वगळता इतर महापालिकांत तीन सदस्यीय प्रभाग रचनेला मान्यता दिली. या निर्णयाने महापालिकेतील प्रभाग रचनेसह आरक्षणही बदलणार आहे. या निवडणुकीसाठी यापूर्वीच आरक्षण निश्‍चित झाले आहे. आज-उद्या निवडणूक जाहीर होईल असे वाटत असतानाच प्रभाग रचना बदलल्याने आरक्षण जाहीर झाल्यापासून लढण्याची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार
वॉशिंग्टनमध्ये मोदींचे जंगी स्वागत; पावसात थांबले भारतीय अमेरिकन

इच्छुकांबरोबरच महापालिकेच्या राजकारणाशी संबंधित नेत्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. आता एका प्रभागात तीन उमेदवार ठरवतानाच प्रबळ उमेदवार विरोधकांना मिळणार नाही याची खबरदारी घेताना या नेत्यांचा कस लागणार आहे. महापालिकेत २०१० पासून पक्षीय राजकारण सुरू झाले, तेव्हापासून दोन्ही काँग्रेसचेच वर्चस्व आहे. त्यातही काँग्रेसचाच वरचष्मा राहिला. यात कधी शिवसेना कधी सत्ताधाऱ्यांसोबत तर कधी विरोधात राहिली आहे. एकीकडे सत्तेची चावी असलेल्या ‘जनसुराज्य’नेही सत्ताधाऱ्यांनाच साथ दिली होती, मावळत्या सभागृहात ‘जनसुराज्य’चा एकही सदस्य नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न असेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार
Banner War : साताऱ्यात श्रेयवादावरून दोन राजे आमने-सामने

शिवसेनेचे पालिकेचे राजकारण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर बघतात. विधानसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. पण त्यानंतर राज्यात दोन्ही काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी करून सत्ता मिळवल्याचे पडसाद पालिकेतही उमटणार आहेत. एकसदस्यीय प्रभाग पद्धतीत आपल्याचा पक्षाचा उमेदवार विजयी करणे सोपे आहे. त्या तुलनेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत हे मोठे आव्हान असणार आहे.

आपल्याला उमेदवार देता येत नाही अशा प्रबळ उमेदवाराला आघाडीच्या पक्षात पाठवून त्याला विजयी करण्याचा प्रयोग यापूर्वी झाला आहे. त्यालाही आता संधी राहील की नाही याविषयी साशंकता आहे. राज्यात ज्याप्रमाणे भाजपला रोखण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले, त्याचप्रमाणे पालिकेतही हा प्रयोग होणार की स्वबळावर लढणार यावरही सत्ता कोणाची हे अवलंबून आहे. यातून महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. तीन प्रभागात उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. एकाला उमेदवारी न मिळाल्यास दुसरा नाराज होऊ शकतो. त्यामुळे बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजपचीही कसोटी लागणार
अमेरिकेच्या FDAची फायजरच्या बूस्टर डोसला परवानगी

तीन प्रभागात हवा संपर्क

ज्या उमेदवाराचा लगतच्या तीन प्रभागात संपर्क आहे त्यालाच या निवडणुकीत विजयाची संधी अधिक असणार आहे. पूर्वी एका प्रभागातील संपर्क पूरेसा होता. आता मात्र तशी स्थिती असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com