दिलासादायक; कोल्हापुरात आज नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट

कोरोनाबाधितांची संख्या चारशेने खाली
दिलासादायक; कोल्हापुरात आज नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची (kolhapur district) संख्या आज चारशेने खाली आली. एका दिवसात १ हजार १८४ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत, (covid-19 patients) तर ३७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १ हजार ५६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास पंधरा दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी आल्याने किंचित दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता होती. यात जिल्ह्यातील आजारा, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड राधानगरी या डोंगरी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या आत आल्याने येथे मोठा दिलासा मिळत आहे. गतवर्षी या तालुक्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण सापडले होते. महापालिका व नगरपालिका हद्दीत स्वॅब संकलनाचे प्रमाण अजूनही कायम आहे. शहरातील कोरोनाबाधितांची वाढ मात्र कमी झालेली नाही. शहरात ३४० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. करवीर, हातकणंगले या तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढ कायम आहे. येथे १२० हून अधिक रूग्णबाधित सापडले आहेत. या दोन्ही तालुक्यात गर्दीची ठिकाणे अनेक आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढते असल्याचे सांगण्यात येते.

दिलासादायक; कोल्हापुरात आज नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट
कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

सोमवार -

  • दिवसभरातील एकूण कोरोनाबाधित ः ११८४

  • दिवसभरातील एकूण कोरोना मुक्त ः १५६८

  • दिवसभरातील एकूण मृत्यू ः ३७

  • आजवरचे एकूण बाधित ः १ लाख ३४ हजार ४९४

  • आजवरचे एकूण कोरोना मुक्त ः १ लाख १८ हजार १५९

  • आजवरचे एकूण मृत्यू ः ४ हजार २०५

  • आजचे एकूण उपचारार्थी ः १२ हजार १२०५

  • शहरातील आजचे बाधित ः ३४०

  • एकूण आजच्या चाचण्या ः ८१२४

  • दिर्घकालीन आजार ः ७

  • ६० वर्षार्वरील मृत्यू ः २२

  • रूग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आतील मृत्यू ः १०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com