पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू बंद; पर्यटकांना प्रवेश बंदी

किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे
पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू बंद; पर्यटकांना प्रवेश बंदी

आपटी (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने आजपासून देशभरातील जवळपास 3691 ऐतिहासिक वास्तुत 15 मे पर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश दिले. संचालक पाठक यांनी दिलेल्या आदेशास अनुसरून येथील ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभागाने पन्हाळगडावरील सर्व ऐतिहासिक वास्तू 15 मे पर्यंत पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्या.

पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला असल्याने येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेटी देतात. इतर किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाचे आदेश प्राप्त होताच पुरातत्त्वच्या कोल्हापूर व कोकण विभागाचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी पन्हाळगडावरील सर्व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्याचे सांगितले. पन्हाळगडाबरोबरच पोहाळे येथील लेणी व खिद्रापुराच्या मंदिराला भेटी देण्याचे पर्यटकांनी टाळावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com