कोल्हापुर: आगीच्या भडक्यात फडकर्‍यांच्या बारा झोपड्या जळून खाक

फडकर्‍यांच्याकडे पाहुन जमलेल्यांचे डोळे पाणावले.
कोल्हापुर: आगीच्या भडक्यात फडकर्‍यांच्या बारा झोपड्या जळून खाक

पट्टणकोडोली (कोल्हापूर) : येथील पट्टणकोडोली (Pattan Kodoli) तळंदगे रस्त्यानजीक चौगुले मळ्यात फडकर्‍यांच्या बारा झोपड्या जळून खाक झाल्या. यात जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. जळलेल्या झोपड्या समोर हताश होऊन बसलेल्या फडकर्‍यांच्याकडे पाहुन जमलेल्यांचे डोळे पाणावले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडीसाठी आलेली ही ऊसतोड मजुरांची टोळी पट्टणकोडोली तळंदगे रस्त्या लगत चौगुले मळा येथे झोपड्या घालुन कारखान्याच्या सुरुवातीपासून वास्तव्यास आहेत. या टोळीत पंधरा जोड्या असून लहान मुलांसह सुमारे चाळीस लोक या वस्तीत सध्या वास्तव्यास आहेत.

कोल्हापुर: आगीच्या भडक्यात फडकर्‍यांच्या बारा झोपड्या जळून खाक
Cold Cough Tips: सर्दी-खोकला असेल तर आहारात समावेश करा 'या' फळाचा
Summary

तळावर एक व्यक्ती लहान मुलांसह थांबवली होता. अचानक लागलेल्या आगीनं त्याने मुलांना सुरक्षीत स्थळी हालवले.

आज सकाळी हे ऊसतोड मजूर पट्टणकोडोली व तळंदगे गावातील दोन शेतांमध्ये विभागून ऊसतोडीसाठी गेले होते. तळावर एक व्यक्ती लहान मुलांसह थांबवली होता. अचानक लागलेल्या आगीनं त्याने मुलांना सुरक्षित स्थळी हलवले. आजुबाजुच्या शेतकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बारा झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.

यामध्ये सर्व प्रापंचिक साहित्यासह कागदपत्रे, पैसे, धान्य, मोबाईल संच अशा सर्व वस्तू या आगीत जळाल्या. अंगावरील कपड्या व्यतिरिक्त दुसरी कपडेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत. झोपड्यांवर आग लागल्याची माहिती मिळताच फडकर्‍यांनी धाव घेतली. जळालेले प्रापचिक साहित्य पाहून हताश होवुन बसले. काही स्त्रिया आपल्या खोपीच्या जागी काही वस्तु कपडे हाताला लागतात का पहात आहेत. घटनास्थळावर जमलेल्या स्थानिक नागरिकांनी हे सारे दृश्य पाहून अश्रु अनावर झाले. यावेळी कारखान्याचे स्लीप बॉय, फिल्डमन, ट्रॅक्टरमालक आदींनी भेट दिली. कारखान्यांने नुकसानभरपाई देऊन या लोकांना सहकार्य करावे अशीही यावेळी अनेकांनी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com