1,500 ची लाच पडली महागात; पोलिस कॉन्स्टेबलसह पोलिस पाटील अटकेत

महिन्याभरात ही दुसरी कारवाई ; पोलिस यंत्रणेत खळबळ
arrested
arrested esakal

इचलकरंजी (कोल्हापूर) : अटक न करण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. असिफ नसिरुद्दीन सिराजभाई हा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल शहापूर पोलीस ठाण्यात (Shahapur Police Station)कार्यरत असून जगदीश भूपाल संकपाळ, (वय-३८ ) हा यड्राव (ता.शिरोळ) गावचा पोलीस पाटील आहे. गेल्या महिन्याभरात इचलकरंजी शहापूर पोलिस ठाण्यातील लाचलुचपत विभागाची दुसरी कारवाई असून आता पोलीस पाटील सापडल्याने खळबळ उडाली आहे.

arrested
बनावट 'आरटीपीसीआर'वर कर्नाटक पोलिसांची करडी नजर; तिघांना अटक

मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या आत्याचे नावे न्यायालयाकडून वॉरंट निघाले होते. त्यामध्ये अटक न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल असिफ सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश संकपा दोघांनी मिळून तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची मागणी केली. तडजोड केल्यानंतर दोघांनी १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने शुक्रवारी सकाळी सापळा रचला. १ हजार ५०० रुपये स्वीकारताच त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शहापूर पोलीस ठाण्यात गेल्या महिन्याभरात ही दुसरी कारवाई असून पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com