जिल्हा बॅंक रणधुमाळी : 'केडीसीसी'साठी 14 नोव्हेंबरला मतदान?

elections
electionssakal media
Summary

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने सर्वच जिल्हा बँकेच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती.

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींचा निकाल जाहीर झाल्यावर आता अंतिम मतदार यादीची तारीख आणि त्यानंतरचा १५ दिवसांचा कालावधी गृहीत धरता बँकेसाठी १४ नोव्हेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे. (Kolhapur news) या निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा संभाव्य कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. (KDCC election 2021)

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली; पण राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने सर्वच जिल्हा बँकेच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid -19) कमी झाल्यावर गेल्या महिन्यात १८ जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यात आली. तत्पूर्वीच कोल्हापूर जिल्हा बँकेची ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

elections
अमेरिकेच्या FDAची फायजरच्या बूस्टर डोसला परवानगी

बँकेच्या निवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावर १३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. दाखल हरकतीवरील सुनावणी होऊन त्याचा निर्णय आज देण्यात आला. आता २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरचा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी गृहीत धरता १२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरण्याचा पहिल्या दिवसापासून ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम गृहीत धरता दिवाळीनंतर म्हणजेच बँकेच्या निवडणुकीसाठी १४ नोव्हेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणुकीचा अधिकृत्त कार्यक्रम तयार करून तो राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल.

elections
राहुल, प्रियांकांकडे अनुभवच नाही : अमरिंदरसिंग

बँकेच्या पात्र संस्था

  • विकास सोसायटी गट- १८६६

  • प्रक्रिया संस्था गट- ४४९

  • नागरी पतसंस्था, बँका गट- १२२१

  • पाणीपुरवठा व इतर संस्था- ४१११

  • एकूण- ७६४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com