

Prashant Kortkar Case: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्य आरोपावरून फरार असलेला प्रशांत कोरटकर याला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकील आणि कोरटकर याच्या वकिलांमध्ये न्यायालयात तीव्र चर्चा झाली.