esakal | कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘साहेबांची तपासणी सुरू आहे, आम्ही पोलिस आहोत’, अशी बतावणी करून दोघा भामट्यांनी वृद्ध व्यक्तीचे ५० हजाराहून अधिक किमंतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. कसबा बावड्यात भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलासराव सुबराव जगताप (वय ८०) हे श्री कॉलनी लाईन बाजार कसबा बावडा येथे राहतात. ते आज दुपारी बँकेत गेले होते. तेथून नातेवाईकांकडे पायी जात होते. दरम्यान जयहिंद कॉलनी परिसरात दोघा तरूणंनी त्यांना थांबवले. ‘आम्ही पोलिस आहोत; स्थानिक गुन्हे शाखेचे जाधव साहेब चेकींग करीत आहेत. तुम्ही बाहेर फिरू नका, तुमच्या जवळील सोन्याची चेन, अंगठी द्या.’ असे त्यांना सांगितले.

त्यातील एकाने आपले नाव ‘अशोक’ असल्याचेही त्यांना सांगितले. जगताप यांनी दोघांवर विश्वास ठेवून गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व १५ हजार रूपये किमंतीची सोन्याची अंगठी काढून दिली. दोघांनी हे दागिने एका कागदात गुंडाळल्याचा बनाव केला. त्यानंतर ते दोघे निघून गेले. जगताप यांनी कागदाची गुंडाळी काढून बघितल्यानंतर त्यात त्यांना दगड असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा भामट्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: दापोली : बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका

भामट्यांचा शोध सुरू

एका संशयित अंदाजे २५ वर्षाचा असून त्याची उंची ५ फूट सहा इंच इतकी असून तो सडपातळ आहे. त्याचा रंग गोरा असून त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट परिधान केली आहे. त्याने आपले नाव ‘अशोक’ असे सांगितले. दुसरा संशयित अंदाजे ३० वर्षाचा असून रंगाने सावळा आहे. त्याची उंची पाच फूट सहा इंच इतकी असून त्याने काळ्या रंगाचा शर्ट व त्याच रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. त्यानुसार पोलिस दोघांचा परिसरातील सीसी टीव्ही आधारे शोध घेत आहेत.

loading image
go to top