esakal | राजापूर: रिफायनरीची बाजू स्थानिकांनी ऐकून घ्यावी
sakal

बोलून बातमी शोधा

rajapur

राजापूर: रिफायनरीची बाजू स्थानिकांनी ऐकून घ्यावी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राजापूर: एमआयडीसी संबंधित बारसू-सोलगाव परिसरामध्ये आधीच अधिसूचना निघालेली आहे. स्थानिक ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच कि.मी. परिसरातील जागाही एमआयडीसीमध्ये समाविष्ट करावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकाऱ्‍यांकडे केली आहे.

हेही वाचा: शिवाजी विद्यापीठात शेतकरी देत आहेत परिक्षा

असे असताना रिफायनरीविरोधी भूमिका घेतलेल्या लोकांसह त्यांना साथ देणाऱ्या एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता, स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतर जरूर तर विरोध सुरू ठेवावा, असे आवाहन बारसू-गोवळ दशक्रोशी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष हनिफ काझी तसेच सोलगांव-देवाचेगोठणे-नाटे प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे यांनी केले आहे.

काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी तो विरोध करावा, असे सांगणाऱ्‍या प्रकल्प विरोधकांना कोकणचा कळवळा होता तर गेली अनेक दशके मुंबईत वास्तव्याला का आहात? यासारखे शेकडो प्रश्‍नही त्यांना विचारा असा सल्ला काझी आणि डॉ. राणे यांनी लोकांना दिला आहे. तालुक्यामध्ये रिफायनरी प्रकल्प झाल्यास, त्याचा जनतेला किती फायदा होणार आहे. याचे शंभर सकारात्मक मुद्दे आहेत.

हेही वाचा: कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू: राजू शेट्टी

मात्र, प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेले पुढारी हे प्रकल्पाची सकारात्मक बाजू ग्रामस्थ ऐकूनच घेऊ नये, यासाठी आटापिटा करीत असल्याचे राणे यांनी सांगितले. तब्बल साडेआठ हजार एकरची संमतीपत्रे असतानाही एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी पडून नाणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

रिफायनरीच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला

दुटप्पी एनजीओ व पुढाऱ्‍यांनी एलपीजीसह रिफायनरीच्या सर्व उत्पादनांवर यापुढे बहिष्कार घालून आपला विरोध नोंदवावा व ताठरपणा दाखवावा, अशी उपहासात्मक टीकाही काझी आणि डॉ. राणे यांनी केली आहे.

एक नजर..

काही ठिकाणी ग्रा.पं. निवडणुकामुळे प्रकल्पाला विरोध

प्रकल्पाचा किती फायदा होणार, याचे शंभर सकारात्मक मुद्दे

प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेल्या पुढाऱ्यांकडून दिशाभूल

सकारात्मक बाजू ग्रामस्थ ऐकूच नयेत, यासाठी आटापिटा

नाणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावला

एनजीओंच्या खोट्या प्रचाराला पडले बळी

loading image
go to top