कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; पावणे पाच लाखांचा दंड वसूल
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापूर : शासनाच्या निर्देशानुसार नियोजित वेळेचा भंग करून अत्यावश्यक सेवा आणि विनापरवाना दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर शहरात पोलिसांनी (kolhapur police) धडक कारवाई (fine)केली. हद्दीत प्रभारी अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. तसेच विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून पावणे पाच लाखांहून अधिकचा दंड वसूल केला.

कोरोना संसर्गाची (covid-19) साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेला सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही नियोजित वेळे व्यतिरिक्त अनेक दुकाने सुरू असतात. त्याचबरोबर ज्या व्यवसायांना परवानगी नाही असे व्यवसायही सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी शहरासह जिल्ह्यात सर्व पोलिस अधिकाऱ्यांना (police officers) तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या कारवाईस आज सकाळ पासून शहरात सुरवात झाली. आज शहरात दिवसभरात २२ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई
Mother's Day Special : कसरत.. आई आणि कोरोना योध्दा म्हणून!

नऊ लाखांचे मद्य जप्त...

जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय केल्या प्रकरणी ३२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ४४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ८ लाख ९२ हजार ३४८ रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com