गोपीचंद पडळकरांचा गनिमी काव्यात आत्मविश्‍वास ढळला नाही; सदाभाऊ खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau khot

बैलगाडी शर्यतीचं आंदोलन करताना ऊस आंदोलनातील अनुभवाचा फायदा झाला.

'गोपीचंद पडळकरांचा गनिमी काव्यात आत्मविश्‍वास ढळला नाही'

सांगली : कुठलंही आंदोलन हे आंदोलन प्रमुखाच्या नियंत्रणात असले पाहिजे. त्याच्या हातातून ते सुटलं तर प्रचंड गडबड होऊ शकते. बैलगाडी शर्यतीचं आंदोलन करताना मला ऊस आंदोलनातील अनुभवाचा फायदा झाला आणि आमदार गोपीचंद पडळकर हे अतिशय प्रामाणिक हेतून आंदोलन करत असल्याने गनिमी कावा करतानाही कुठे आत्मविश्‍वास ढळला नाही, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त लावलेला असताना त्यांना चकवा देत आटपाडी तालुक्यात बैलगाडी शर्यतीचे आंदोलन पार पडले. काल म्हणजे गुरुवारी सायंकाळी सदाभाऊ खोत झरेकडे निघाले असताना विभुतवाडी येथे त्यांना अडवले होते, परंतू त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांना सोडले. तेथून ते पडळकर यांच्या रेस्ट हाऊसमध्ये गेले. तेथे आमदार पडळकर, आमदार जयकुमार गोरे आणि सदाभाऊ यांच्यात खलबते झाली.

हेही वाचा: सांगलीकर सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह ; 'इन्स्टा’ वर दीड लाख युजर्स

सदाभाऊ म्हणाले, ‘‘आम्ही एकावेळी अनेक ठिकाणी मैदानांची तयारी करून ठेवली होती. कारण, आंदोलन कसं करायचं असतं, हे मला नवं नाही. ऊस आंदोलनाचा पक्का अनुभव आहे. प्रशासन, पोलिस कशी अडवणूक करतात, लोकांची भूमिका कशी असते, हे जवळून पाहिले आहे. त्यामुळे रात्री दोनपर्यंत पक्के नियोजन झाले. कुठे शर्यत घ्यायची हे ठरले आणि मगच आम्ही थोडी विश्रांती घेतली. सकाळी आम्ही तयार होतोच, मात्र त्याआधी शर्यत संपली होती, आंदोलन यशस्वी झाले होते. आम्ही ठरवलेल्या ठिकाणी शर्यत घेतली असती तर मोठा गोंधळ माजला असता. शेकडो गावचे लोक आले होते. कोण कुणाचे ऐकले नसते. नाहक प्रश्‍न निर्माण झाले असते. आंदोलन कदाचित हातातून सटकले असते. ते फार घातक असते. आम्ही ती वेळ येऊ दिली नाही.’’

Web Title: Sadabhau Khot Speech On Zhare Bullock Cart Race Sangli Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bullock Cart Race