'मलिकांचा राजीनामा घ्या अन्यथा मंत्र्यांना स्वस्त बसू देणार नाही'

अन्यथा मंत्र्यांना स्वस्त बसू देणार नाही- समरजितसिंह घाटगे
SamarjeetSinh Ghatge
SamarjeetSinh Ghatge Esakal

कागल : जमीन खरेदी करून मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हसीना पारकर (Haseena Parkar) यांना पैसे दिले. हे पैसे दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरले हे कृत्य देशद्रोही आहे. मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी कोणीही रस्त्यावर उतरले नाही. नवाब मलिक यांचा विषय भ्रष्टाचाराचा नसून देशद्रोहाचा आहे त्यामुळे नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा. तो झाल्याशिवाय आम्ही मंत्र्यांना स्वस्त बसू देणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (SamarjeetSinh Ghatge) यांनी दिला.

कागल तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कागल शहरात निषेध फेरी काढण्यात आली. या निषेध फेरीत महाविकास आघाडी सरकारच्या व नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

SamarjeetSinh Ghatge
शेतकऱ्याच्या पोराने वीज मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र

समरजितसिंह घाटगे म्हणाले, वाईन विकायला वेळ आहे. मात्र गेले कित्येक दिवस आंदोलन करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडे बघायला मंत्र्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांच्या ५० हजार अनुदानाची काळजी नाही,विजेची काळजी नाही यासाठी महाविकास आघाडीचे मंत्री रस्त्यावर आले नाहीत. नवाब मलिक यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मंत्र्यांना आम्ही स्वस्थ बसू देणार नाही.

Summary

वाईन विकायला वेळ आहे. मात्र गेले कित्येक दिवस आंदोलन करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडे बघायला मंत्र्यांना वेळ नाही.

राष्ट्रवादी नावाचा मान राखा. आतंकवाद्यांना पाठिंबा देवून राष्ट्रवादी व शरद पवार यांच्या नावाला गालबोट लावता. पहिले राष्ट्रवादी आहात का ते तपासून घ्या. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी माफीनामा दिल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसू देणार नाही असे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, यशवंत माने, बाबुराव पाटील, रमीज मुजावर, अरुण सोनुले, असिफ मुल्ला आदीसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com