सांगली : अपघात १४ वारकरी जखमी; दिंडीत घुसली जीप| Road Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Road Accident

सांगली : अपघात १४ वारकरी जखमी; दिंडीत घुसली जीप

सांगली : आषाढीवारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअप गाडी घुसल्याने अपघात (Road Accident) झाला. या अपघात १४ वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरींना मिरज सिव्हिल आणि कवठेम्हणकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आषाढीवारीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघाली होती. ही दिंडी मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ असताना दिंडीत पिकअप जीप घुसली. या अपघातात १४ वारकरी जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात (Road Accident) घडताच चालक गाडी सोडून पळून गेला.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद गेल्याच दुःख नव्हतं तर...

वारकरी लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्याप्रमाणे पंढरपुराकडे जातात. त्याप्रमाणेच राज्यभरातील अनेक गावांमधून छोट्या छोट्या दिंड्याही पंढरपूरच्या दिशेने जात आहे. अशाच एका पायी जाणाऱ्या दिंडीत जीप घुसली.

Web Title: Sangli Road Accident 14 People Injured Jeep Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..