कोल्‍हापूर : पोस्टात व्याजासाठी बचत खाते अनिवार्य

बॅंकिंग नियमांत उद्यापासून बदल; बँकेच्‍या बचत खात्यातील किमान शिल्लक १० वरून १२ हजार
Savings account mandatory for postage interest Minimum balance in bank savings account from 10 to 12 thousand kolhapur
Savings account mandatory for postage interest Minimum balance in bank savings account from 10 to 12 thousand kolhapur sakal

कोल्‍हापूर : एक एप्रिलपासून बॅंक, पोस्ट व गुंतवणुकीच्या काही नियमांत बदल होत आहेत. त्यामुळे आर्थिक आराखडे बांधण्यापूर्वीच याची माहिती घेणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी सवलती वाढविल्या आहेत. तर काही ठिकाणी कमी केल्या आहेत; तसेच काही ठिकाणी केवळ नेटबॅंकिंग आणि यूपीआयद्वारेच पैसे भरावे लागणार आहेत. तेथे धनादेश, डिमांड ड्राफ्ट (डीडी) चालणार नसल्याचे आयसीएआयच्या डब्ल्यूआयआरसी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सुशांत गुंडाळे (सी.ए.) यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

पोस्टाबाबतचे नियम

पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत गुंतवणुकीसाठी आवश्यक बदल होणार आहेत. १ एप्रिल २०२२ पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेवीवरील व्याज फक्त बचत खात्यात जमा होतील. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम

१ एप्रिलपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे हस्तांतरण करता येणार नाहीत. म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल MF युटिलिटीज (MFU) ३१ मार्च २०२२ पासून धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट (चेक-डीडी) इत्यादीद्वारे पेमेंट सुविधा बंद करणार आहे. या बदलानुसार १ एप्रिलपासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील.

अॅक्सिस बँक आणि पीएनबीच्या (PNB) नियमांमध्ये बदल

१ एप्रिल २०२२ पासून अॅक्सिस बँकेच्या पगार किंवा बचत खात्यावरील नियमात बदल करण्यात आला आहे. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लकेची मर्यादा १० हजारांवरून १२ हजार रुपये केली आहे. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने मोफत रोख व्यवहारांची मर्यादा देखील बदलून चार विनामूल्य व्यवहार किंवा १.५ लाख रुपये केली आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक एप्रिलमध्ये पीपीएस लागू करत आहे. ४ एप्रिलपासून १० लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी बंद

कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत आहे. मात्र आता काही बँका ही योजना बंद करू शकतात. एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष योजना दोन वर्षांसाठी बंद करू शकतात. कारण या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना वाढवण्याची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत या दोन बँका विशेष एफडी योजना बंद करू शकतात, असे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com