esakal | भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण दस्तावेजाची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण दस्तावेजाची निर्मिती

भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण दस्तावेजाची निर्मिती

sakal_logo
By
मतीन शेख

मुंबई : भारतीय कुस्तीला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. कुस्तीतील बारकावे पैलवान शंकरराव पुजारी यांनी आयुष्यभर जपले. कुस्ती समलोचनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहचवले. आज पुस्तकाच्या स्वरूपात कुस्तीचा तोच इतिहास संकलन करून एक ऐतिहासिक दस्तावेजाची निर्मिती झाली आहे. हे फार मोठे काम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ज्येष्ठ कुस्ती समलोचक पै. शंकरराव पुजारी यांच्या 'भारतीय कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते.

हेही वाचा: मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं !

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. गेल्या 60 वर्षांतील समकालीन कुस्ती विश्वाचे समग्र चित्रण या पुस्तकात सचित्र मांडलेले आहे. भारतीय कुस्तीची परंपरा, कुस्ती विश्वाचे बदलते स्वरूप यांचा संपुर्ण थांडोळा सचित्र, रंगीत पारदर्शिकतून या पुस्तकातून मांडलेला आहे. यावेळी लेखक पै. शंकरराव पुजारी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, तेजस प्रकाशन चे प्रमुख रावसाहेब पुजारी, शिरोळच्या पसायदानचे संचालक संजीव पुजारी, रविकिरण ढवळे आदी उपस्थित होते.

loading image