कोल्हापूर : सूर्यफूल बियाण्‍यांचा आणखी १५ दिवस तुटवडा

शेतकऱ्यांना घ्यावे लागणार पर्यायी पीक; तेलाचे दर वाढण्याची शक्यता
sunflower
sunflower

कुडित्रे : राज्यासह जिल्ह्यात आणखी पंधरा दिवस सूर्यफूल बियाणे(sunflower seeds) उपलब्ध होणार नाही, अशी माहिती कृषी खात्यातील(agro department) शासकीय सूत्रांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी सूर्यफूल करणाऱ्या शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी हंगाम कालावधी पुढे जाणार असून शेतकऱ्यांनी सूर्यफूल बियाण्‍याला पर्यायी पीक घ्यावे लागणार आहे. दरम्यान, यापुढे सूर्यफूल पीक घेता आले नाही तर सूर्यफूल तेलाचे दर वाढतील(incrase rate of sunflower oil rate) असे चित्र आहे.

जानेवारीपासून उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सूर्यफूल बियाण्‍यांचा तुटवडा आहे. जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल, असा अंदाज असून, यासाठी ७० क्विंटल बियाण्‍यांची मागणी असताना एक किलोही बियाणे उपलब्ध झालेले नाही. एकीकडे खाद्य तेलाचे दर भरमसाठ वाढत आहेत. दुसरीकडे तेलबियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपूर्वी बोगस सूर्यफूल बियाण्‍‍यांमुळे अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. यानंतर जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे. मात्र, आता खाद्य तेलाचे दर भरमसाट वाढत आहेत. सूर्यफूल तेलाचा दर २०० रुपये किलोच्या वरती गेला आहे. त्यामुळे शेतकरी नव्याने सूर्यफूल व भुईमूग पीक घेण्यावर भर देत आहे.

sunflower
कोल्हापूर जिल्हा बॅंकेत ‘स्वीकृत संचालक’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

जिल्ह्यात रब्बी, उन्हाळी आणि खरीप मध्‍येही काही शेतकरी सूर्यफूल पीक घेतात. रब्बी हंगामात सुमारे ६० हेक्‍टर, तर उन्हाळी हंगामात सुमारे शंभर हेक्टर सूर्यफूल पीक घेतले जाते. यासाठी सुमारे ७० क्विंटल बियाण्यांची मागणी होत असते. पन्हाळा, शाहूवाडी, करवीर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल बियाण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्यफुलाचे प्लॉट फेल गेले. यामुळे बियाण्‍यांचा तुटवडा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उन्हाळी हंगाम वाया जाण्याची भीती

उन्हाळी हंगामात बियाणे उपलब्ध न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. सध्या सर्वत्र उसाचे खोडवे व काढण्यात येणाऱ्या ऊस पीकाच्या तोडण्या सुरू आहेत. यामुळे बियाण्‍यांची मागणी होत आहे. जिल्हा कृषी खात्यातील शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपन्या बियाणे तयार करतात. मात्र, बियाणे प्लॉट फेल गेल्यामुळे आणखी पंधरा दिवस राज्यभर बियाणे उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकासाठी ठेवलेले क्षेत्र इतर पिकाखाली घ्यावे लागणार आहे.

sunflower
इचलकरंजी : दारू पिण्यासाठी तीस रुपये न दिल्याच्या कारणातून खून

सतरा सदस्यांचे आमचे एकत्र कुटुंब आहे. नदीकाठचा ऊस गेल्यानंतर नेहमी सूर्यफूल एक एकर, दोन एकर घेतले जाते. अजून बियाणे उपलब्ध झालेले नाही. यामुळे हंगाम पुढे जाण्याची भीती आहे. कृषी खात्याने तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे.

-गोपाळ खाडे, शेतकरी सांगरुळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com