'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल

'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
Summary

दूध पॅकिंगसाठी भोकरपाडा येथे विस्तार करायचाच आहे, तर वाशी येथे जागा घेण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे?

कोल्हापूर : गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी राजकीय सूडबुद्धीने, दिशाहीन आणि संघ विकासाला बाधा आणणारे निर्णय घेतले आहेत. (Kolhapur update) यात संघाला ५५ कोटींचा तोटा झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. (Kolhapur Gokul) दूध पॅकिंगसाठी भोकरपाडा येथे विस्तार करायचाच आहे, तर वाशी येथे जागा घेण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा सवालही केला. (Gokul Sangh) आज गोकुळची ऑनलाईन वार्षिक सभा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर महाडिक यांनी हल्लाबोल केला. (Shoumika Mahadik)

शौमिका म्हणाल्या, 'मुंबई येथील पॅकेजिंगचा ठेका इग्लू कंपनीकडे होता. तेथे प्रतिलिटर दूध पॅकेजिंगसाठी १.६२ रुपये दिले जात होते. नव्या करारात इग्लू कंपनीने ९ पैशांनी दर वाढवून मागितला होता. त्यांच्याशी चर्चा न करता ठेका रद्द करून महानंदला दिला. गोकुळचा टेट्रा पॅकच्या पॅकेजिंगचा ठेकाही महानंदकडे आहे. टेट्रा पॅकमधील दुधाची मासिक विक्री ७५ हजार लिटरवर गेल्यास टेट्रा पॅकेजिंगचा प्लांट संघाच्या स्वत:च्या जागेत म्हणजे कोल्हापूर येथे सुरू केला जाणार होता; पण नवीन संचालकांनी अभ्यास न करता ठेका बदलण्याचा निर्णय घेतला. यात पूर्वीचा खर्च आणि आत्ताच्या खर्चात वाढ झाली आहे. सत्ताधारी पॅकेजिंग खर्च कमी केल्याचा ढोल वाजवत आहेत. हा दर प्रतिलिटर १ रुपये ३१ पैशाने वाढला आहे. पूर्वीच्या करारात १ टक्के तूट असताना आता ३ टक्के जास्त तूट दाखवली आहे. दह्याचे दर वाढवल्याने दैनंदिन विक्री २० वरून १५ टनांवर आली आहे. वाशीमध्ये सध्याच्या जागेच्या लगतच्या जागेसाठी १९ कोटी आणि यंत्र सामग्रीसाठी सुमारे १९ कोटी म्हणजे ३८ ते ४० कोटी खर्च केले जात आहेत. विस्तारासाठी गरज नसतानाही भोकरपाडा येथे १६ एकर जागेसाठी ४४ कोटी आणि बांधकामसाठी २४२ कोटींचा खर्च येणार आहे. तसा हा खर्च ५०० कोटींपर्यंत जाणार आहे. त्यामुळे एवढी जागा घेण्याची गरज नाही.' या वेळी माजी संचालक रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.

'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
PM मोदींसोबत भेटीवेळी कमला हॅरिस यांनी पाकिस्तानला सुनावलं

शौमिका म्हणतात,

- दोन रुपये दूध दरवाढ नियमितच यामध्ये संचालकांचे श्रेय नाही

- रोजंदारी कमी करून कायम कर्मचाऱ्यांवर कामाचा भार

- पगारात कपात नव्हेतर ओव्हरटाईमसाठी जादा पगार

- राजकीय द्वेषापोटी बल्ककुलर बंद केले

- काही कर्मचाऱ्यांच्या आकसातून १२० किलोमीटरवर बदल्या

- क्षुल्लक कारणावरून ब्लककुलरचे ठेके रद्द

‘व्यंक‍टेश्‍वरा’कडून घोटाळा नाही

व्यंकटेश्‍वरा मुर्व्हसला इतर संघापेक्षा जादा दर दिला व शेकडो कोटीचा घोटाळा केला, अशी टीका होत आहे; पण या सर्वांची 'गोकुळ'कडून लेखी माहिती घेतली आहे. यामध्ये व्यंकटेश्‍वराला इतरांपेक्षा जादा दर दिलेला नाही. यात गैरव्यवहार झालेला नाही, असे 'गोकुळ'ने लेखी दिले आहे. त्यामुळे आरोप करताना अभ्यास करून आणि माहिती घेऊन करावेत असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
पंतप्रधानांचा नॉन स्टॉप अमेरिका प्रवास

मग सभा ऑनलाईन का?

'गोकुळ'ची निवडणूक ऑफलाईन घेतली. त्यामुळे संघासाठी खरेदी केली जाणारी ३२४ कोटींच्या जागेचा निर्णय ऑनलाईन सभेत नको. अजून पाच वर्ष तुमचीच सत्ता आहे. संघाला तोटा होईल, असा निर्णय घेऊ नका. ३२४ कोटींची तरतूद कशी करणार असा सवालही महाडिक यांनी केला.

चार महिन्यांतील झालेला तोटा

  • महानंदमध्ये पॅकेजिंग सुरू केल्याने : ११ कोटी ९५ लाख

  • कोल्हापूर विभागात दूध विक्री दरवाढ न केल्याने : १० कोटी ५८ लाख

  • प्रभात डेअरीत पॅकेजिंग सुरू केल्याने : २३ लाख ७२ हजार

  • पुण्यात पॅकेजिंग बंद करून कोल्हापुरातून पुरवठा : १२ काटी ७७ लाख

  • बाहेरील राज्यातील पुरवठादाराकडून दूध खरेदी : ८ कोटी ७५ लाख

  • जागा खरेदीसाठी भांडवली उत्पन्नावरील व्याज : ३ काटी ७८ लाख

डोंगळेंकडून स्पष्टीकरण

वासाचे दूध संस्थांना परत देणार हा अजेंडा घेऊन सत्तेत आलेल्यांचे वास्तव ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नसल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
श्री अंबाबाई मंदिरात स्वच्छता, रंगरंगोटी सुरू

संघावर ५०० कोटींचा बोजा

संघासाठी १० ते ११ एकर जमीन खूप झाली. जेवढी गरज आहे तेवढी जागा घेण्यास हरकत नाही; पण जास्त जागा घेतली तर संघावर ५०० कोटींचा बोजा होईल. धोका पत्करून निर्णय घेऊ नये, असे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनी आवाहन केले.

खाडे, नरके, घाटगे गैरहजर

गोकुळचे विरोधी पक्षाचे विद्यमान संचालक बाळासाहेब खाडे, चेतन नरके आणि अंबरिषसिंह घाटगे या पत्रकार परिषदेला गैरहजर होते. काही कामानिमित्त हे संचालक उपस्थित नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com