सोमय्यांना जिल्ह्यात दोन महिने बंदीच

जिल्हाधिकारी रेखावार; पुढील आदेशाबाबत सूचना घेणार
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी (ता. २८) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पूर्वी काढलेल्या बंदी आदेशानुसार सोमय्या यांना दोन महिने जिल्हा बंदीच आहे; पण मंगळवारच्या दौऱ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी कोणते नियोजन करता येईल, यासाठी शासनाकडून सूचना घेऊन निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यावर सोमय्या दौऱ्यावर येणार होते. दरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी बंदी आदेश दोन महिन्यांपर्यंत लागू आहेत. दरम्यान, सोमय्या यांनी पुन्हा मंगळवारी येणार आहेत. त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे सोमय्या यांच्या दौऱ्याबाबत वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com