खो ना जाएँ यें तारे जमीं पर!

जागृती, योग्य वेळच्या निदानामुळे स्वमग्न मुलांची संख्या वाढली
 children
children sakal

कोल्हापूर: सुमारे ३५ वर्षांपूर्वी अडीच हजारांत एक, २५ वर्षांपूर्वी ५०० मुलांत एक, तर २० वर्षांपूर्वी २५० मुलांत एक असणाऱ्या स्वमग्न मुलांचं प्रमाण झपाट्याने वाढत गेलं आणि आता तर ६८ ते ७० मुलांमागे एक इतक्‍या जवळ येऊन ठेपलं आहे. त्यातही आता स्वमग्नतेबाबतची जागृती हळूहळू होत असून, योग्य वेळी निदान होत असल्याने स्वमग्न मुलांचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, त्याचवेळी आता त्यांच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

मुळात डोळ्यांची व हातांची विचित्र हालचाल, विशिष्ट वस्तूच्या ठराविक भागाकडेच एकटक बघत राहणे, ही या मुलांची प्रमुख लक्षणं. स्वतःच्याच विश्‍वात रममाण असणाऱ्या या मुलांचं निदान ती किमान दोन ते तीन वर्षांची होईपर्यंत होत नाही आणि त्याचमुळे मग अनेक प्रश्‍नांचा गुंता समोर उभा टाकतो; मात्र अशा मुलांची शोधमोहीम आता शासनानेच सुरू केली आहे. त्याचा स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच फायदा होऊ लागला आहे. स्वमग्न मुलांसाठी विविध उपचारात्मक शिक्षण पद्धती अधिक उपयुक्त ठरते; पण त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विशेष सवलतीही दिल्या आहेत.

असाही गैरसमज

स्वमग्न मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बऱ्याचदा अशा मुलांकडे गतिमंद किंवा मतिमंद म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात. शब्दांच्याही पलीकडे ते आपल्या देहबोलीतून जे काही सांगण्याचा प्रयत्न करतात, ते जर पालकांना समजले तर त्यांचा हा निःशब्द संवादाचा किमान घराच्या चार भिंतींच्या आत तरी वावर सहज होतो.

जगभर २ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागृती दिवस म्हणून साजरा होतो. ‘सर्वसमावेशक शिक्षण’ ही यंदाची संकल्पना आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे, ही आपली जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (ता. २) सायंकाळी पाचला ऐतिहासिक बिंदू चौकात ‘साखळी ऑटिझम जागृतीची’ हा उपक्रम होईल. त्यात शक्यतो ऑटिझम जागृतीचे प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचे कपडे परिधान करून सर्वांनी सहभागी व्हावे.’’

- दीपा शिपूरकर,अमन फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com