म्युकरच्या रुग्णांवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया; राज्यातील पहिलीच घटना

mucormycosis
mucormycosismucormycosis

कोल्हापूर: येथील सीपीआरमध्ये म्युकरमायकोसीसवर (mucormycosis) उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी करताना हृदयविकाराची लक्षणे दिसून आली. भूलतज्‍ज्ञ, नाक, कान, घसा विभागाचे डॉक्टरांनी हृदयविकारतज्‍ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांना रुग्णालय दाखवले. तपासणीनंतरही गंभीर हृदयविकार असल्याचे लक्षात आले. तिन्ही विभागाच्या डॉक्टरांनी उपचाराला सुरवात केली. यात डॉ. बाफना, डॉ. वरुण देवकाते यांच्या पथकाने या रुग्णावर हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केली. राज्यातीलही पहिलीच घटना असल्याचा दावा वैद्यकीय तज्‍ज्ञांनी केला. (successful-heart-surgery-on-mucormycosis-patients-in-kolhapur-health-news)

६२ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला म्युकरमायकोसिसची लक्षणे होती. चेहरा सुजला होता तर हिरड्या व नाकातून म्युकरचा संसर्ग डोळ्यांकडे जाण्याची शक्यता होती. त्यांच्यावर म्युकरची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. भूलतज्‍ज्ञांनी त्यांना तपासले, तेव्हा त्या रुग्णाला हृदयविकाराची लक्षणे दिसली. भूलशास्त्र विभागाने कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद समानगडकर यांनी हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ. बाफना यांच्याकडे रुग्णाला तपासणीला पाठवले.

डॉ. बाफना यांनी त्या रुग्णांची हृदय तपासणी केली. त्यात रुग्णाच्या रक्त वाहिन्यांत ब्लॉकेज असल्याचे दिसले. त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी शस्त्रक्रिया करण्यास मान्यता दिली. म्युकरमायकोसिसची लक्षणे असताना रुग्णाची हृदय शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. मात्र खबरदारी घेत एका तासात रुग्णांवर ॲन्जीओप्लास्टी केली. तीन दिवसाच्या उपचारात या रुग्णाच्या हालचाली पूर्ववत झाल्या. या रुग्णाला म्युकर विभागाकडे दिले. दोन दिवसांनी म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रुग्णांची प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मोफत उपचार

म्युकरमायकोसिस गंभीर आजार आहे. अशा गंभीर लक्षणाच्या रुग्णावर उपचार करताना भूल द्यावी लागणार होती. यावेळी हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्याने तेथेही धोका होता. या दोन्ही डॉक्टरांनी हे धोके ओळखून डॉ. बाफना यांचा सल्ला घेतला. तपासणी केली जोखीम पत्करून रुग्णावर हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केली. तिन्ही विभागाच्या डॉक्टरांनी दाखविलेला समयसूचकता तसेच कर्तव्य तत्परतेमुळे रुग्णाला जीवदान मिळाले. एवढ्या गंभीर रुग्णावर तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया मोफत झाल्या आहेत.

‘‘सीपीआर रुग्णालयांतील वैद्यकीय पथकाने केलेली म्युकरमायकोसिस शस्त्रक्रिया व हृदय शस्त्रक्रिया परस्परातील समन्वयातून यशस्वी केल्या. चांगली कामगिरी केली आहे. यात प्रत्येक डॉक्टर, निवासी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ यांचे योगदान मोलाचे आहे.’’

- डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

‘‘रुग्णावर हृदयशस्त्रक्रिया झाली, त्याबरोबर म्युकरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रुग्णाच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक उपचार करत आहे. रुग्ण पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल.’’

- डॉ. अजित लोकरे, नाक कान घसा विभागप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com