कोल्हापूरच्या मातीला स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श

कोल्हापूरकरांनी जपल्या स्मृती; जुना राजवाडा, मुक्तांबिका मंदिर, राजाराम महाविद्यालयाला भेट
swami vivekanand
swami vivekanand sakal
Summary

कोल्हापूरकरांनी जपल्या स्मृती; जुना राजवाडा, मुक्तांबिका मंदिर, राजाराम महाविद्यालयाला भेट

कोल्हापूर : स्वामी विवेकानंद १० ऑक्टोबर १८९२ ला कोल्हापुरात आले होते. त्यांचे येथे एक ते दोन दिवस वास्तव्यही होते. साठमारी येथील मुक्तांबिका (gajendralakshmi) मंदिरात त्यांचा निवास होता. भवानी मंडपाजवळील राजाराम महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान झाल्याचेही सांगितले जाते. करवीर संस्थानाकडून त्यांचा आदर-सत्कार झाला होता. विवेकानंदांच्या(swami vivekanand) वास्तव्याच्या खुणा आजही त्या परिसरातील नागरिकांनी जपल्या आहेत. एका विश्वविख्यात विचारवंताचा पदस्पर्श या मातीने अनुभवला असल्याची भावना आजही कोल्हापूरकरांच्या मनात आहे.

swami vivekanand
संपाचा तिढा न सुटल्याने कारवाईच्या भीतीने एसटी चालकाची आत्महत्या

स्वामी विवेकानंद ज्यावेळी परिव्राजक होते, तेव्हा त्यांनी देशाची परिक्रमा केली. या काळात ते कोल्हापुरात आले होते. जुने कोल्हापूर शहर हे तटबंदीच्या आत वसलेले असल्याने लोकांचा वावर मर्यादित होता. मंगळवार पेठेतील साठमारीजवळ मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) हे मंदिर आहे. शहराभोवती असणाऱ्या नवदुर्गांपैकी ही एक दुर्गा आहे. तेथे विवेकानंद यांचा निवास होता. याच मंदिरात ते रात्री झोपले होते. प्रजाहितरक्षक राजा अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज(rajashri chtrpati shahu maharaj) यांची ख्याती होती. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांना त्यांची भेट घेण्याची इच्छा होती. ते भवानी मंडपातील जुना राजवाडा येथे गेले. मात्र, महाराज त्या वेळी नव्हते. ते भावनगर (gujarat) येथे भाऊसिंगजी महाराज यांच्याकडे गेले होते. त्यामुळे विवेकानंद आणि आणि शाहू महाराज यांची भेट झाली नाही. त्यावेळी लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी स्वामी विवेकानंद यांचा करवीर संस्थांनतर्फे सत्कार केला. करवीर संस्थानची भेट म्हणून कोल्हापुरी चप्पलचा जोडही भेट देण्यात आला.

swami vivekanand
सहा काय १० आमदार निवडून आणा; हसन मुश्रीफांचे संजय मंडलिकांना उत्तर

मुक्तांबिका मंदिरात निवास

स्वामी विवेकानंद कोल्हापुरात येऊन गेले होते, याचा सार्थ अभिमान कोल्हापूरकरांना आहे. विवेकानंदांनी ज्या मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) मंदिरात निवास केला होता, त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रम बांधला आहे. १४ जानेवारी १९२१ ला शंकरराव दत्तात्रय ऊर्फ दादा गजबर यांनी आश्रमाची स्थापना केली. साठमारी येथील बंगल्यात पूर्वी संस्थेचे कार्यालय होते. तेथे १९४५ मध्ये मराठी शाळा सुरू झाली. सातवीपर्यंतचे वर्ग भरायचे. नंतर लोकवर्गणीतून २०२० मध्ये नवी इमारत बांधली. येथे वाचनालयासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. महापालिका होण्यापूर्वी येथे कौन्सिल होती. त्यावेळी केशवराव जगदाळे, एम. के. जाधव यांनी गोखले महाविद्यालयाजवळील चौकाला ‘स्वामी विवेकानंद चौक’ असे नाव दिले. या चौकापासून मंगळवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याचे ‘स्वामी विवेकानंद मार्ग’ असे नामकरण केले.

swami vivekanand
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनस्थळी मृत्यू

स्वामी विवेकानंद शिकागोला जाण्यापूर्वी तत्कालीन करवीर संस्थानात आले होते. मात्र, त्यांची आणि शाहू महाराजांची भेट होऊ शकली नाही. पण, करवीर संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

- प्रा. डॉ. रमेश जाधव,

ज्येष्ठ इतिहास संशोधक

स्वामी विवेकानंद(SWAMI VIVEKANAND ) यांच्या कोल्हापुरातील स्मृती जपण्यासाठी स्वामी विवेकानंद आश्रम स्थापन केला. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून विवेकानंदांचा विचार भावी पिढ्यांना देण्याचे काम गेली १०० वर्षे अविरतपणे सुरू आहे.

- आनंदराव पायमल, अध्यक्ष,

स्वामी विवेकानंद आश्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com