फळ विक्रेता झाला सनदी अधिकारी

स्वप्निल माने यांनी नागरी सेवा परीक्षेत पटकावला ५७८ वा क्रमांक
Swapnil Mane
Swapnil ManeSakal

सिद्धनेर्ली - येथील स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे. परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीने गाड्यावरील फळ विक्रेता ते सनदी अधिकारी असे मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.

आज दुपारीच जाहीर झालेल्या या निकालात अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्निल याचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर भागशाळा नदीकिनारा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय सिद्धनेर्ली येथे झाले.इयत्ता १० मध्ये ८४.७३ % गुण मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांना आयसीआरई गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी पदविका घेतली.

लहानपणीच आईच निधन झाल्याने परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. डिप्लोमा मध्ये ८७.९४ गुण मिळवूनही पुढील शिक्षण घेण्याच्या अशा धूसर झालेल्या असताना त्याला काही लोकांनी शिक्षणासाठी मदत केल्याने विश्वकर्मा इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी (VIT), पुणे या नामांकित शिक्षण संस्थेत बी.ई मेकॅनिकलसाठी प्रवेश मिळवला. त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडीट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांची तयारी पुणे येथे सुरु केली.

पहिल्या दोन प्रयत्नात पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा तयारी चालू ठेवली. दरम्यान वडिलांचं गावी अपघाती निधन झाल्याने त्याला काही काळ गावी परतावं लागले.कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होवून मे २०२१ मध्ये मुलाखत झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्वप्निल माने यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. इयत्ता ४ थी मध्ये आईचा व २०१८ मध्ये वडील या दोघांच्या मृत्यूने खचून न जाता परिस्थितीचा बाऊ न करता मिळवलेले हे यश इतरांनाही प्रेरणादायी आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होवूनही स्वप्निल माने यांने या परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती. त्यामुळे मराठी माध्यमातील मुले मागे पडतात हा समज स्वप्निल माने यांच्या यशाने खोटा ठरवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com