कोल्हापुर : विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी लावणारा ‘टेक्नोसाय’

जाई पाटील यांचा विद्यार्थी केंद्रित स्टार्टअप; सहावी ते आठवी अभ्यासक्रम
कोल्हापुर : विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी लावणारा ‘टेक्नोसाय’
sakal

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञानाची गोडी कमी होऊ नये, यासाठी ‘टेक्नोसाय’ गेम्सचा स्टार्टअप आकाराला आला आहे. सहावी ते आठवीतील विज्ञानाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रयोग तयार केले आहेत. कोरोनामुळे नोकऱ्या गमावण्याची वेळ अनेकांवर आली असताना कोल्हापुरातल्या जाई पाटील यांचा हा विद्यार्थी केंद्रित स्टार्टअप महत्त्वपूर्ण ठरत आहे. जाई ऑटोमोबाईल इंजिनिअर आहेत.

कोल्हापुर : विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी लावणारा ‘टेक्नोसाय’
'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल

त्यांनी गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय करायचे?, असा विचार केला. विज्ञान विषय शिकायचा असेल, तर तो प्रयोगात्मक पद्धतीने उत्तमरीत्या शिकता येतो, हा त्यांचा अनुभव होता. या विषयातील विद्यार्थ्यांची गोडी कमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षण क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आई दिशा यांच्याशी चर्चा करून त्यांनी प्रत्येक इयत्तेचे किमान पन्नास प्रयोग तयार करण्याचे निश्चित केले. त्याचे गेममध्ये रूपांतर केले. त्यांना एक प्रयोग तयार करण्यासाठी १० ते ३० मिनिटांचा कालावधी लागला.

सीबीएसई, आयसीएसई, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान विषयाची पुस्तके घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना कळतील, या तऱ्हेने संकल्पना स्पष्ट केल्या. शाळांच्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे. सध्या त्यांच्या बॅचला सुमारे ५० विद्यार्थी आहेत. या विषयावर त्यांनी तीन महिन्यांचा कोर्स तयार केला आहे. विशेष म्हणजे दर शनिवारी त्या दीड तास लाईव्ह सेशनद्वारे मार्गदर्शन करतात. यात त्या २० धड्यांतील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करतात.

"मुंबई सायन्स रिसर्च असोसिएशनतर्फे दरवर्षी ‘डॉ. होमीभाभा यंग सायंटिस्ट’ परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातून ४० हजार विद्यार्थी परीक्षेस बसतात. त्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित हे गेम्स महत्त्वपूर्ण आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित उपयोग होईल."- जाई दिशा पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com