बूथ कार्यकर्त्यांच्या जेवणासाठीचे ‘ते’पैसे

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sakal

कोल्हापूर - मतदारांना वाटपासाठी नव्हे, तर बूथवरील कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी पकडले व गुन्हा दाखल केला. त्याच्याकडे मोठी रक्कमही सापडली नाही. पराभव समोर दिसू लागल्याने आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही दडपशाही सुरू केली आहे. याला भाजप कार्यकर्ते घाबरणार नाहीत. कार्यकर्त्यांनी ठामपणे आपल्या बूथवर थांबावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह काही जणांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पकडले.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी मतदारांना पैसे वाटण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे कार्यकर्ते बूथवर थांबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था लावत होते. त्यांच्याकडे फार मोठी रक्कमही मिळाली नाही. एका कार्यकर्त्याच्या घरी जबरदस्तीने पोलिस घुसले. त्यांनी घरातील साहित्य विस्कटले. मात्र या घरातही काही सापडले नाही. काही करून कार्यकर्त्यांना २४ तास आत ठेवायचे हाच या मागचा उद्देश आहे. पण याला भाजपचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवर ठामपणे थांबावे. आपला विजय निश्चित आहे. त्यावर उद्या शिक्कामोर्तब होईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com