युक्रेनमध्ये बेळगावचे दोन विद्यार्थी अडकले

पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांची माहिती
Ukraine Russia Conflict
Ukraine Russia Conflictटिम ई सकाळ

बेळगाव : रशियाने अचानक यूक्रेनवर आक्रमण केले आहे. यामुळे भारत सरकारने युक्रेनमध्ये १०० भारतीय अडकल्याची माहिती दिली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पालकमंत्री गोविंद कार्जोळ व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी गुरुवारी (ता. २४) पत्रकारांना दिली. ते सुखरुप असल्याचीही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी रशियाने युक्रेनवर आक्रमन केले. यामुळे भारत सरकारने युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २४ तास सुरू राहणारी मदत वाहिनी अर्थात हेल्पलाइन सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील अमोघ चौगुला तसेच रायबाग तालुक्यातील प्रिया निडगुंदी अशी या विद्यार्थ्यांची नांवे असून ते वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत.

Ukraine Russia Conflict
चिक्कोडी कृषी जिल्हा घोषणेच्या हालचालींना वेग

भारतात माघारी परतण्यासाठी विमानाची तिकिटे आरक्षित केली आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील नागरी हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी किव येथील भारतीय दूतावासाने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सल्ला देताना युक्रेन हवाई मार्ग बंद असल्यामुळे सर्व प्रमुख विमानसेवा रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. आपण युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना कळविले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांसाठी +३८ ०९९७३००४२८, +३८ ०९९७३००४८३, +३८ ०९३३९८०३२७, +३८ ०६३५९१७८८१, +३८ ०९३५०४६१७०. या अतिरिक्त हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.

Ukraine Russia Conflict
गडहिंग्लज पालिकेच्या आखाड्यात शड्डू घुमणार

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील नागरी हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी किव येथील भारतीय दूतावासाने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सल्ला देताना युक्रेन हवाई मार्ग बंद असल्यामुळे सर्व प्रमुख विमानसेवा रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले आहे. दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. आपण युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना कळविले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांसाठी +३८ ०९९७३००४२८, +३८ ०९९७३००४८३, +३८ ०९३३९८०३२७, +३८ ०६३५९१७८८१, +३८ ०९३५०४६१७०. या अतिरिक्त हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com