सावधान : म्युकरमायकोसिसमुळे आणखी तिघांचा मृत्यू

mucormycosis
mucormycosismucormycosis

कोल्हापूर: गंभीर कोरोनाबाधित (covid 19)म्हणून उपचार घेणाऱ्या तीन जणांना म्युकरमायकोसीस(mucormycosis)या आजाराची लक्षणे होती. या तिघांचाही सीपीआर रुग्णालयात आज मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची नोंद कोरोना मृत्यू अशीच झाली आहे.जिल्ह्यात दोन महिन्यांपासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण संख्या वाढत आहे. सीपीआरमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यात आज नव्याने तीन रुग्ण दाखल झाले. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या ८५ पर्यंत पोचली आहे. सीपीआरमधील म्युकरचे तीनही कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. (three-more-died-of-mucormycosis-infarction-kolhapur-marathi-news)

तिघांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत होती. त्याची माहिती कोरोना विभागातील डॉक्टरांनी म्युकरमायकोसिस विभागातील डॉक्टरांना दिली. त्यानुसार उपचारही सुरू झाले, मात्र तिन्ही रुग्ण अतिगंभीर असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचा आज मृत्यू झाला. तिघांपैकी एक परजिल्ह्यातील आहे. म्युकरमायकोसिस विभागात उपचार घेणाऱ्या ४० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. दोघे पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत?

दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पाच खासगी रुग्णालयांना म्युकरवर उपचार करण्याची मान्यता आहे, मात्र तेथे बेड शिल्लक नाहीत म्हणून रुग्ण सीपीआरकडे पाठवले जात आहे. खासगी डॉक्टरांकडूनही म्युकरवर उपचारासाठी फारसा प्रतिसाद नाही, अशी स्थिती आजही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com