टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

01468
कात्यायनी ः छत्रपती शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते व्ही. बी. पाटील, अजयसिंह देसाई यांना जीवनगौरव, उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्काराने गौरविण्यात आले.

बांधकाम व्यवसायाला इंडस्ट्रीजचा दर्जा मिळावा

श्रीमंत शाहू छत्रपती; बिल्डर्स असोसिएशनतर्फे पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. २३ ः बांधकाम व्यवसायाला इंडस्ट्रीजचा दर्जा मिळाला पाहिजे, शासनाने एक खिडकी योजना राबवली तर बिल्डर्सचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी होतील, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. ते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरतर्फे कात्यायनी येथे झालेल्या पदग्रहण आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, बिल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष अविनाश पाटील, जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, प्रताप कोंडेकर आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांचे कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, दोन वर्षे कोरोनामुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले होते. कोरोना ओसल्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यात बांधकाम व्यवसाय महत्त्वपूर्ण असून त्या माध्यमातून अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. कोल्हापूरमध्ये घरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बिल्डर्सनी चांगल्या प्रकल्पांची उभारणी करणे गरजेचे आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते, धरणे, इमारती यांची बांधणी करताना योग्य नियोजन केले पाहिजे.
खासदार मंडलिक म्हणाले, बांधकाम व्यवसायिकांनी सर्व घटकातील लोकांना परवडणारी घरे बांधावीत. बांधकामाला लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. हे कमी होणे गरजेचे आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्‍न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अविनाश पाटील म्हणाले, बांधकाम व्यवसायाला लागणाऱ्या साहित्याच्या दरावर केंद्र व राज्य सरकारचा अंकुश असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांची मनोगते झाली. कोल्हापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी केले. यावेळी नूतन अध्यक्ष ऋषिकेश यादव, उपाध्यक्ष मदन भंडारी, सेक्रेटरी उमेश शेटे, जॉईंट सेक्रेटरी रणजित पाटील यांचा सत्कार झाला.

पुरस्कार वितरण सोहळा....
यावेळी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार, मानपत्र व शाहू महाराजांचा ग्रंथ देऊन ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, अजयसिंह विठ्ठलराव देसाई, सोपान दामोदर पाटील यांना गौरवण्यात आले. मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार, मानपत्र व शाहू महाराजांचा ग्रंथ देऊन स्व. कृष्णात ज्ञानदेव कोंडेकर, स्व. बाबुराव भाऊसो निगडे, स्व. सुहास गणपतराव लिंग्रज यांना गौरविले. त्यांच्या कुटुंबीयांकडे हा पुरस्कार सुपूर्द केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top